शाळांनी अतिरिक्त शुल्क आकारू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:17 IST2021-06-19T04:17:22+5:302021-06-19T04:17:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, गारगोटी, कोरोना पार्श्वभूमीवर सर्व शाळा, कॉलेज बंद असल्याने शाळांनी संपूर्ण फी आकारून पालकांना वेठीस धरू नये, ...

शाळांनी अतिरिक्त शुल्क आकारू नये
लोकमत न्यूज नेटवर्क,
गारगोटी,
कोरोना पार्श्वभूमीवर सर्व शाळा, कॉलेज बंद असल्याने शाळांनी संपूर्ण फी आकारून पालकांना वेठीस धरू नये, असे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने देण्यात आले आहे.
गेले एक वर्ष झाले शाळा, काॅलेज सुरू नाहीत. लोकांच्या हाताला कामधंदा नाही, कोणाची नोकरी गेली आहे. अशा काळात विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरणे जिकिरीचे झाले आहे. विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी लक्षात घेता सर्व शाळा आणि कॉलेजनी आपली फी माफ करावी. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशाचा मान ठेवत आपण आपल्या शिक्षण शुल्कात सरसकट कपात करावी. त्याचबरोबर विद्यार्थी ज्या सुविधा वापरत नाहीत त्याचे शुल्क आकारू नये. ज्या विद्यार्थ्यांचे मागील वर्षाचे शुल्क राहिले असेल त्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत परीक्षेपासून अथवा शिक्षणापासून वंचित ठेवू नये, तसेच त्याला शाळा, महाविद्यालय सोडण्यास भाग पाडू नये, अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस भुदरगड यांच्यावतीने पंचायत समिती भुदरगडचे गटशिक्षण अधिकारी रवींद्र चौगले यांना देण्यात आले आहे. त्याचबरोबर या निवेदनाच्या प्रति कोल्हापूर जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण सहसंचालक यांनाही देण्यात आल्या आहेत.
यावेळी उपस्थित कोल्हापूर जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक अमित देसाई, तालुकाध्यक्ष अनिरुद्ध देसाई, उपाध्यक्ष अभिषेक देसाई, सरचिटणीस विश्वराज माने, आदित्य देसाई, प्रतीक येळणे, प्रज्योत पाटील, तन्मय येळणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ओळ
फी माफीचे निवेदन गटशिक्षणाधिकारी चौगले यांना देताना अमित देसाई, अनिरुद्ध देसाई, तन्मय येळणे, प्रज्योत पाटील, आदित्य देसाई आदी.