‘टीव्हीवरील शाळा’ उपक्रम स्तुत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:16 IST2021-07-08T04:16:45+5:302021-07-08T04:16:45+5:30

रूकडी माणगाव : माणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने माणगाव येथे ‘टीव्हीवरील शाळा’ हे उपक्रम स्तुत्य असून, यांचे उदाहरण अन्य शाळांना देऊ, ...

The ‘School on TV’ initiative is commendable | ‘टीव्हीवरील शाळा’ उपक्रम स्तुत्य

‘टीव्हीवरील शाळा’ उपक्रम स्तुत्य

रूकडी माणगाव : माणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने माणगाव येथे ‘टीव्हीवरील शाळा’ हे उपक्रम स्तुत्य असून, यांचे उदाहरण अन्य शाळांना देऊ, असे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी केले. ते माणगाव येथे टीव्हीवरील शाळा उपक्रम पाहणीदरम्यान माणगाव येथे आले असता गौरवोद्गार काढले. त्यांच्यासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण उपस्थित होते.

माणगाव ग्रामपंचायतीने कोविड काळामध्ये राबविलेल्या विविध योजनांची माहिती जिल्हाधिकारी बलकवडे यांनी घेतली व केलेल्या कामाचे कौतुक केले. याप्रसंगी गतवर्षी कोविड अलगीकरण कक्षामध्ये विनामूल्य काम केलेल्या गावातील शल्यविशारद यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

प्राथमिक आरोग्य अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकडून कोविडबाबत आढावा बैठक घेण्यात आले. याप्रसंगी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, अप्पर तहसीलदार शरद पाटील, तहसीलदार प्रदीप उबाळे, गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी, पोलीस उपनिरीक्षक उपराटे, सरपंच राजू मगदूम, उपसरपंच अख्तर भालदार, पोलीस पाटील करसिध्द जोग, माजी सरपंच जिनगोंडा पाटील, अनिल पाटील, आय. वाय. मुल्ला, माजी सरपंच अविनाश माने, तलाठी जयवंत पोवार, ग्रामविकास अधिकारी राठोड हे उपस्थित होते.

Web Title: The ‘School on TV’ initiative is commendable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.