शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: खड्ड्यात पडून शाळकरी विद्यार्थी गंभीर जखमी, जलवाहिनीची गळती काढण्यासाठी काढला होता खड्डा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 14:19 IST

नागरिकांमधून तीव्र संताप

अमर पाटील

कळंबा : कळंबा-गारगोटी राज्यमार्गावर वाहतुकीच्या वर्दळीच्या रस्त्यावर एका सांस्कृतिक कार्यालयासमोर जलवाहिन्याच्या गळत्या काढण्यासाठी कळंबा ग्रामपंचायत प्रशासनाने काढलेल्या खड्ड्यात पडून शाळकरी विद्यार्थी गंभीर जखमी झाला. अनुष रवींद्र पाटील असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. अनुषच्या ओठात दात घुसला तर नाक फ्रॅक्चर होऊन डोळ्यास इजा झाली. काल, बुधवारी सायंकाळी ही घटना घडली.कळंबा येथील राम गल्लीत शहर वृत्तपत्र विक्रेते रवींद्र पाटील कुटुंबियांसमवेत राहतात. त्यांचा मुलगा अनुष शहरातील शाळेत दहावीत शिकत असून बुधवारी सायंकाळी खासगी क्लासमधून सायकल वरून घरी येत होता. अंधारात खड्डा न दिसल्याने खड्ड्यात पडून तो गंभीर जखमी झाला. खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. जलवाहिनीतील गळती काढण्यासाठी तीन दिवसांपूर्वी कळंबा ग्रामपंचायत प्रशासनाने मोठा खड्डा काढला आहे. याठिकाणी सुरक्षिततेसाठी बरेकेट्स उभे केले नव्हते. खड्ड्या नजीक पथदिवे नसल्याने रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले होते. याठिकाणी अनेक प्रवासी पडून किरकोळ जखमी झाले आहेत. तरी देखील प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. यातच आता शाळकरी मुलगा जखमी झाल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर