शालेय स्पर्धेचा कार्यक्रम निश्चित

By Admin | Updated: July 24, 2014 21:43 IST2014-07-24T21:33:29+5:302014-07-24T21:43:41+5:30

६ आॅगस्टपासून आयोजन

School Competition Program | शालेय स्पर्धेचा कार्यक्रम निश्चित

शालेय स्पर्धेचा कार्यक्रम निश्चित

ओरोस : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत प्रतिवर्षी विविध शासकीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. २०१४-१५ मध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. यापैकी जिल्हास्तर शालेय फुटबॉल स्पर्धा आयोजनाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.वयोगट १४ वर्षाखालील मुले- मुलींची स्पर्धा ६ आॅगस्ट, १७ वर्षाखालील मुले- मुलींची स्पर्धा ७ आॅगस्ट तसेच १९ वर्षाखालील मुले- मुलींची स्पर्धा ८ आॅगस्ट रोजी जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या शाळांनी आपल्या संघाची प्रवेशिका ४ आॅगस्टपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास आवश्यक ते शुल्क भरून सादर करावी.या स्पर्धेबाबत माहितीकरिता २िङ्म२्रल्लँि४४ि१ॅ. ु’ङ्मॅ२स्रङ्म३.्रल्ल या ब्लॉगवर पहावे किंवा क्रीडा अधिकारी सचिन निकम यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी केले आहे. (वार्ताहर)

Web Title: School Competition Program