शैक्षणिक व्यासपीठातर्फे आज शाळा बंद
By Admin | Updated: December 9, 2015 01:56 IST2015-12-09T01:40:38+5:302015-12-09T01:56:11+5:30
प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार

शैक्षणिक व्यासपीठातर्फे आज शाळा बंद
कोल्हापूर : अशैक्षणिक धोरणांना विरोध तसेच प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या १०५३ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आज, बुधवारी व उद्या, गुरुवारी बंद ठेवण्यात येणार आहेत. ‘कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठातर्फे’ हे आंदोलन छेडण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीने हे आंदोलन उभारले आहे. जिल्ह्यात व्यासपीठातर्फे आज, बुधवारी दुपारी दोन वाजता मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले जाणार आहे. ‘बंद’बाबत शाळांशी संपर्क साधला आहे. त्याला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, समितीचे आंदोलन असल्याने शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे शाळांना सूचना देण्याचा प्रश्न येत नाही. आमच्या दृष्टीने बुधवारी शाळा सुरूच राहणार आहेत, असे शिक्षण उपसंचालक मकरंद गोंधळी म्हणाले. (प्रतिनिधी)