शिष्यवृत्तीची परीक्षा होऊ शकते, मग शाळेची का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:21 IST2021-04-14T04:21:58+5:302021-04-14T04:21:58+5:30
परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेशित करणे योग्य वाटत नाही. निवडणुका, शिष्यवृत्तीच्या परीक्षा होतात. मग, ऑफलाईन नाही, निदान ...

शिष्यवृत्तीची परीक्षा होऊ शकते, मग शाळेची का नाही?
परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेशित करणे योग्य वाटत नाही. निवडणुका, शिष्यवृत्तीच्या परीक्षा होतात. मग, ऑफलाईन नाही, निदान ऑनलाईन तरी विद्यार्थ्यांची परीक्षा घेता आली असती. सलग दोन वर्षे परीक्षा पुढे गेल्याने त्याचा विद्यार्थ्यांना एकप्रकारे फटका बसणार आहे.
- रवींद्र गोताड, दसरा चौक.
आपल्याला गेल्यावर्षीच्या कोरोनाचा अनुभव होता. दुसरी लाट येण्याची शक्यताही वर्तविली होती. त्यानुसार शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर पुढे अडचण आली, तर परीक्षा घेण्यासह मूल्यांकन करण्याच्या दुसऱ्या पध्दतीचा विचार शासनाने करायला हवा होता. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या शिक्षणापैकी त्याला कितपत आकलन झाले आहे, ते जाणून घेण्यासाठी त्यांचे मूल्यांकन होणे आवश्यक आहे. शासनाने मूल्यांकन, चाचणी घेण्याची पध्दत बदलली पाहिजे.
- प्रमोद पाटील, मंगळवार पेठ.
चौकट
ही ढकलगाडी काय कामाची?
परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे हे किती योग्य आहे? सलग दुसऱ्यावर्षी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणार नाही. त्यामुळे चुकीचा पायंडा पाडला जात आहे. ऑनलाईन परीक्षा घेण्यास काही हरकत नव्हती. जे विद्यार्थी वर्षभर गैरहजर होते, त्यांना उत्तीर्ण न करण्याचा निर्णय इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशनने घेतला असल्याची माहिती या असोसिएशनचे प्रदेश अध्यक्ष राजेंद्र दायमा यांनी दिली.
पॉंईंटर
जिल्ह्यातील वर्गनिहाय विद्यार्थी संख्या
वर्ग मुले मुली
पहिली २९१२५ २६१७६
दुसरी ३०३८४ २७०६८
तिसरी ३०५६९ २७०४०
चौथी ३११८८ २६६४६
पाचवी ३१५१७ २६३२४
सहावी ३१४९८ २५८९७
सातवी ३२२२९ २६०९१
आठवी ३२३५७ २६४४३
नववी ३३१९७ २७०२९
अकरावी २७७९२ २३५६७