शिष्यवृत्तीची परीक्षा होऊ शकते, मग शाळेची का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:21 IST2021-04-14T04:21:56+5:302021-04-14T04:21:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनामुळे सलग दुसऱ्यावर्षी इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा ...

Scholarship exams can happen, so why not school? | शिष्यवृत्तीची परीक्षा होऊ शकते, मग शाळेची का नाही?

शिष्यवृत्तीची परीक्षा होऊ शकते, मग शाळेची का नाही?

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोनामुळे सलग दुसऱ्यावर्षी इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा झालेली नाही. त्यांना पुढील वर्गामध्ये प्रवेशित करण्यात आले आहे. त्याबाबत अधिक तर पालक, शिक्षणतज्ज्ञांच्यामते, उशिरा का होईना, पण परीक्षा होणे आवश्यक होते. कोरोना असताना शिष्यवृत्तीची परीक्षा होऊ शकते, मग शाळेची का नाही, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.

गेल्यावर्षी कोरोनामुळे इयत्ता पहिली ते नववी, अकरावीच्या परीक्षा घेण्यात आल्या नाहीत. या विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या घटक चाचण्या, सहामाही परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांच्या सरासरीद्वारे मूल्यांकन करून त्यांना उत्तीर्ण करीत पुढील वर्गामध्ये प्रवेश देण्यात आला. जूनपासून ऑनलाईन, तर डिसेंबरपासून इयत्ता पाचवी ते अकरावीपर्यंतचे शिक्षण सुरू झाले. यंदा वार्षिक परीक्षा होतील असे विद्यार्थी, पालकांना वाटत होते. मात्र, त्यातच मार्चपासून पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य शासनाने पहिल्यांदा इयत्ता पहिली ते आठवी आणि त्यानंतर इयत्ता नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना विनापरीक्षा पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, त्यादरम्यान कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करीत एनएमएमएस शिष्यवृत्तीची परीक्षा ऑफलाईन स्वरूपात झाली. त्यापध्दतीने पहिली ते अकरावीपर्यंतच्या परीक्षा घेणे शक्य होते. विनापरीक्षा विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देणे त्यांच्या शैक्षणिक भविष्याच्यादृष्टीने अयोग्य असल्याचे मत पालक, शिक्षणतज्ज्ञांतून व्यक्त होत आहे.

परीक्षेबाबत तज्ज्ञ काय म्हणतात?

कोरोनाबाबतची सद्यस्थिती पाहता, त्यातून मार्ग काढण्यासाठी शासनाने निर्णय घेतला. कोरोनामुळे विविध क्षेत्रांमध्ये बदल झाले आहेत. ते लक्षात घेऊन शिक्षण, मूल्यमापन पध्दतीमध्ये आपण बदल करणे आवश्यक आहे.

- डॉ. सुनीलकुमार लवटे.

परीक्षा टाळणे हा पर्याय बरोबर नाही. ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेता आली असती. भविष्याचा विचार करता, परीक्षा, मूल्यमापन पध्दतीत बदल करणे गरजेचे आहे. अंतर्गत सातत्यपूर्ण आणि समग्र पध्दतीचा परीक्षा, मूल्यमापनामध्ये समावेश करावा.

- डॉ. बी. एम. हिर्डेकर.

विद्यार्थ्यांच्या बुध्दिमत्तेचे मूल्यमापन करण्याचे साधन हे परीक्षा आहे. त्यामुळे परीक्षा रद्दचा निर्णय योग्य वाटत नाही. उशिरा का होईना, पण, परीक्षा होणे आवश्यक होते.

- एस. जी. कुलकर्णी.

===Photopath===

130421\13kol_1_13042021_5.jpg

===Caption===

डमी (१३०४२०२१-कोल-स्कूल डमी)

Web Title: Scholarship exams can happen, so why not school?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.