शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

‘स्कॉलर’ बनला अट्टल चोरटा

By admin | Updated: April 23, 2016 01:42 IST

चैनीचा हव्यास : देऊळवाडीच्या महाविद्यालयीन युवकाचे कृत्य; साडेअकरा लाखांचा माल जप्त

कोल्हापूर : चैनी, सुखासीन जगण्याची सवय व महागडे मोबाईल, दुचाकी गाड्या वापरण्याच्या हव्यासापोटी सामान्य कुटुंबातील दहावीमध्ये ९५ टक्के गुण मिळविणारा गुणवंत विद्यार्थी घरफोडी करणारा अट्टल चोरटा बनला. अवधूत ईश्वरा पाटील (वय १९, रा. देऊळवाडी,ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याकडून तब्बल दहा घरफोड्यांतील सोन्या-चांदीचे दागिने, लॅपटॉप व दोन दुचाकी असा सुमारे ११ लाख ३६ हजार ३२५ रुपयांचा माल जप्त केला. याबाबतची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.पोलिस अधीक्षक देशपांडे म्हणाले, ‘एक विद्यार्थी दर आठवड्याला वेगवेगळे महागडे मोबाईल वापरत असून त्याच्याकडे दोन महागड्या दुचाकी आहेत. तो आठवड्याला सुमारे चार ते पाच हजार रुपये खर्च करतो,’ अशी माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवून त्याची सर्व माहिती मिळविली. त्यानुसार संशयित अवधूत ईश्वरा पाटील याला बुधवारी (दि. १९) पकडले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गोवा येथे चोरलेल्या पाकिटातील कृष्णात सीताराम बाचणकर यांचा वाहन परवाना देऊन दुचाकी भाड्याने घेऊन ती चोरून आणल्याचे सांगितले. त्यानंतर सावंतवाडी येथून एक मोपेड त्याने चोरली. चोरलेल्या पाकिटातील पैसे, एटीएम कार्डचा वापर करून अवधूतने खरेदी-विक्री करणाऱ्या वेबसाईटवर बनावट अकौंट व ई-मेल आयडी तयार केला. त्या अकौंटवरूनच तो चोरलेले मोबाईल विकू लागला. त्यानंतर तो सीमकार्ड नष्ट करत होता. चोरीच्या पैशांतून वेबसाईटवरून खरेदी केलेले व चोरलेले मोबाईल, लॅपटॉप जादा किमतीने विक्री करत असे. पाकीट, लॅपटॉप चोरता-चोरता त्यानंतर बंद घर, फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून घरफोडी करून लागला. त्याने चोरलेल्या १२ लाख ७५ हजार २५ रुपये किमतीच्या मुद्देमालापैकी सुमारे ११ लाख ३६ हजार ३२५ रुपयांचा माल जप्त केला आहे. त्याला न्यायालयाने सोमवारी (दि. २५)पर्यंत पोलिस कोठडी दिली.ही कारवाई पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक युवराज आठरे, हेड कॉन्स्टेबल भारत कांबळे, अजिज शेख, राहुल देसाई, विजय देसाई, विनायक फराकटे, अजित वाडेकर, सागर कोळी, अभिजित व्हरांबळे,प्रशांत पाथरे,सुभाष चौगुले,संदीप कापसे यांनी केली.यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक चैतन्या एस.डॉ.दिनेश बारी,शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे उपस्थित होते.शिक्षा व्हावी : पालकांची भावनाअवधूत हा महाविद्यालयात वेगवेगळे महागडे मोबाईल, ब्रँडेड कपडे वापरत असल्यामुळे महाविद्यालयामधील मित्र-मैत्रिणी त्याचे कौतुक करत असत. चोरीच्या पैशांतून तो मित्रांना पार्टी देत होता. त्याचबरोबर देऊळवाडी गावाकडे तो दुचाकी घेऊन जात असे. घरच्यांनी विचारले तर ही मित्राची दुचाकी आहे, असे तो सांगत असे. चोरीच्या प्रकाराबद्दल त्याला शिक्षा झाली पाहिजे, असे पाटील कुटुंबीयांचे मत असल्याचे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी पत्रकारांना सांगितले.आता रडून काय उपयोग...दोन दिवसांपूर्वी अटक केलेला संशयित अवधूतला केलेल्या कृत्याबद्दल पश्चाताप झाला. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेवेळी तो रडू लागला. आपली चूक झाल्याची भावना त्याच्या चेहऱ्यावर होती.---------------तरुणाईची गुन्हेगारी प्रवृत्तीची वाटचाल ही धोकादायक आहे. ती बदलणे गरजेचे आहे.त्यासाठी आता समाजातील स्वयंसेवी संस्थांनी असे चित्र बदलण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.- प्रदीप देशपांडे, जिल्हा पोलीस अधीक्षक, कोल्हापूर.