‘बी.ए., बी.कॉम.’ परीक्षांचे वेळापत्रक आज जाहीर होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:25 IST2021-03-27T04:25:43+5:302021-03-27T04:25:43+5:30
कोल्हापूर : तांत्रिक अडचणीमुळे शिवाजी विद्यापीठाने पुढे ढकललेल्या हिवाळी सत्रातील बी.कॉम., बी.एस्सी.सह पाच अभ्यासक्रमांच्या (नियमित अथवा सीबीसीएस) अंतिम (तृतीय) ...

‘बी.ए., बी.कॉम.’ परीक्षांचे वेळापत्रक आज जाहीर होणार
कोल्हापूर : तांत्रिक अडचणीमुळे शिवाजी विद्यापीठाने पुढे ढकललेल्या हिवाळी सत्रातील बी.कॉम., बी.एस्सी.सह पाच अभ्यासक्रमांच्या (नियमित अथवा सीबीसीएस) अंतिम (तृतीय) वर्षाच्या परीक्षा दि. १२ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. त्याचे सविस्तर वेळापत्रक आज, शनिवारी परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केले जाणार आहे.
यातील बी.कॉम. बॅचलर ऑफ फूड टेक्नॉलॉजी ॲण्ड मॅनेजमेंट आणि बी.एस्सी. फूड टेक्नॉलॉजी ॲण्ड मॅनेजमेंट अभ्यासक्रमाच्या परीक्षा दि. १२ एप्रिलपासून, बी.एस्सीच्या १७ एप्रिलपासून, तर बी.ए. अभ्यासक्रमाच्या परीक्षा दि. ४ मेपासून होणार आहेत. त्याचे सविस्तर वेळापत्रक शनिवारी जाहीर होईल. ऑनलाइन पध्दतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाकडून मॉकटेस्ट घेण्यात येत आहे. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्यांपैकी अद्याप वीस हजार विद्यार्थ्यांनी मॉकटेस्ट दिलेली नाही. त्यांनी ती लवकर द्यावी. याबाबत त्यांना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास विद्यापीठाच्या हेल्पलाइनशी संपर्क साधावा, असे आवाहन परीक्षा मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी केले. दरम्यान, हिवाळी सत्रातील पाचव्या दिवशी बी. कॉम. आयटी, बँक मॅनेजमेंट, आदी विविध विषयांच्या ३४२५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये ३४१३ जण ऑनलाइन परीक्षार्थी होते.