सावंत, पाटोळे यांना मुदतवाढ, चौघांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:29 IST2021-08-17T04:29:37+5:302021-08-17T04:29:37+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात चार वर्षे व कोल्हापूर परिक्षेत्रात आठ वर्षे कार्यकाल पूर्ण झालेल्या पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. ...

सावंत, पाटोळे यांना मुदतवाढ, चौघांची बदली
कोल्हापूर : जिल्ह्यात चार वर्षे व कोल्हापूर परिक्षेत्रात आठ वर्षे कार्यकाल पूर्ण झालेल्या पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. यामध्ये दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या परिक्षेत्रात तर दोन अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या परिक्षेत्राबाहेर करण्यात आल्या तर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे तानाजी सावंत व विशेष शाखेचे शशिराज पाटोळे यांना वर्षभरासाठी मुदतवाढ देण्यात आली तर पो. नि. राजेंद्र मस्के यांची विनंती बदली अमान्य करण्यात आली. हे आदेश कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी रविवारी काढले.
कोरोना महामारीमुळे लांबणीवर पडलेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला. जिल्ह्यातील सहापैकी चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. बदली झालेले पोलीस निरीक्षक पुढीलप्रमाणे (बदलीचे ठिकाण - कंसातील सध्याची नेमणूक) : सीताराम डुबल-सोलापूर ग्रामीण (राजारामपुरी), उदय डुबल- सांगली (राधानगरी), राजू ताशिलदार- कोल्हापूर (सांगली), आप्पासाहेब कोळी-कोल्हापूर (सांगली), रवींद्र धैर्यशील शेळके-कोल्हापूर (सांगली) यांच्या बदल्या करण्यात आल्या.
विनंती बदल्या : सतीश होडगर- पुणे ग्रामीण (कोल्हापूर), श्रीकांत कंकाळ-मुंबई (सायबर), राजेश गवळी - कोल्हापूर (सोलापूर ग्रामीण).
बदलींना वर्षभर मुदतवाढ : तानाजी सावंत-स्थानिक गुन्हे अन्वेषण (अकार्यकारी पदावर नियुक्ती), शशिराज पाटोळे-विशेष शाखा.