शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

सावकर मादनाईकांचा जिल्हा नियोजन समिती सदस्यत्वाचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 17:29 IST

महापुरात शेतकऱ्यांची फसवणूक केली, एफआरपीचे तुकडे करणाऱ्या आघाडी सरकारकडून आपल्याला कोणतेही पद नको.

उदगाव : जिल्हा परिषदेचे माजी सभापती, 'स्वाभिमानी'चे नेते सावकर मादनाईक यांनी जिल्हा नियोजन समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला. सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गजानन पाटील यांच्याकडे त्यांनी आज, शुक्रवारी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा सुपुर्द केला. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष शैलेश आडके उपस्थित होते. काल, गुरुवारी विशेष निमंत्रित सदस्य म्हणून मादनाईक यांच्या नियुक्तीची घोषणा झाली होती. पाच महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांकडे निवडीबाबत यादी पाठवली होती. त्यावरती काल, गुरुवारी शिक्कामोर्तब झाले. स्वाभिमानी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडली. त्यामुळे नियोजन समितीचे पद नको असल्याचे पत्र यापूर्वीच देण्यात आले होते. मात्र तरीही यांची नियुक्तीची घोषणा झाल्याने त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारकडून कोणतेही पद नकोआपण महाविकास आघाडी मधुन बाहेर पडलो आहोत. महापुरात शेतकऱ्यांची फसवणूक केली, एफआरपीचे तुकडे करणाऱ्या आघाडी सरकारकडून आपल्याला कोणतेही पद नको. महाविकास आघाडी सर्व निर्णय शेतकरी विरोधी घेत असल्यामुळे या पदाचा राजीनामा देत असल्याचे सावकर मादनाईक यांनी सांगितले.जिल्हा नियोजन समितीवर २० जणांना संधीजिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्यपदी आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील, राष्ट्रवादीचे मधुकर जांभळे यांच्यासह २० जणांची निवड करण्यात आली आहे.नव्याने निवड झालेले सदस्य असे : नामनिर्देशित सदस्य : आमदार आबिटकर, आमदार पाटील, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जे. एफ. पाटील, एम. एस. देशमुख (कोल्हापूर), संभाजी पवार (रा. लाटवडे, ता. हातकणंगले), शिवसेनेचे बाजीराव पाटील (रा. शिये, ता. करवीर).विशेष निमंत्रित सदस्य असे : राष्ट्रवादीचे मधुकर जांभळे (रा. बालिंगे, ता. करवीर), जयसिंग पाटील (रा. सुळंबी, ता. राधानगरी), माजी उपमहापौर संजय मोहिते ( कोल्हापूर), भगवान जाधव (रुकडी, ता. हातकणंगले), भारत पाटील (भुये, ता. करवीर), प्रेमला पाटील (कोरोची, ता. हातकणंगले), सर्जेराव शिंदे (दानोळी, ता. शिरोळ), माजी आमदार संपतराव पवार- पाटील यांचा मुलगा क्रांतिसिंह पवार- पाटील (सडोली खालसा, ता. करवीर), माजी नगरसेवक सुरेश ढोणुक्षे (कोल्हापूर),  सचिन ऊर्फ युवराज पाटील (गडमुडशिंगी, ता. करवीर), मोहन धुंदरे ( राशिवडे, ता. राधानगरी), तानाजी आंग्रे (वरणगे, ता. करवीर), पोपट दांगट.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना