शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

स्वाभिमानी संघटनेचे सावकर मादनाईक शिंदेसेनेच्या वाटेवर, विधानसभेच्या तोंडावर राजू शेट्टींना धक्का बसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 13:39 IST

‘स्वाभिमानी’च्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणारे ते प्रमुख शिलेदार

जयसिंगपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल ऊर्फ सावकर मादनाईक एकनाथ शिंदे यांच्या शिंदेसेनेच्या वाटेवर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांना पक्षात येण्याची ऑफर देण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर स्वाभिमानीला मोठा धक्का बसणार आहे. याबाबत कोल्हापुरातून राजकीय खलबत्ते घडली असून, मादनाईक यांचा लवकरच निर्णय होणार असल्याचे समजते.गेली २० वर्षे माजी खासदार राजू शेट्टींच्या खांदाला खांदा लावून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे कार्य त्यांनी सुरू ठेवले आहे. शेट्टींचे सुरुवातीपासूनचे ते खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख राहिली आहे. ‘स्वाभिमानी’च्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणारे ते प्रमुख शिलेदार म्हणून ओळखले जातात. सन २०१४ व २०१९ मध्ये त्यांनी शिरोळ विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. कट्टर कार्यकर्ता म्हणून त्यांची भूमिका आतापर्यंत राहिली आहे. विधानसभेच्या तोंडावर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. मादनाईक यांना शिंदेसेनेत येण्याचा प्रस्ताव आला आहे. त्याबाबत कोल्हापूर येथून राजकीय घडामोडी घडल्याचे वृत्त आहे. मादनाईक हे शिंदेसेनेसोबत गेल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेत राजकीय भूकंप होणार आहे. ऐन विधानसभेच्या तोंडावर स्वाभिमानीला हा मोठा धक्का मानला जाईल. त्यामुळे येणाऱ्या काळात कशा घडामोडी घडतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून पक्षात येण्याची ऑफर आली आहे. सन्मानाचे पद मिळत असेल तर कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार आहे. गेली २० वर्षे स्वाभिमानीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी चळवळ सुरू ठेवली आहे. ही चळवळ कायम ठेवून राजकारणात वेगळा निर्णय घेऊ; पण सन्मानाचे पद मिळायला पाहिजे. शिंदे गटाकडून पक्षात येण्याची ऑफर आली आहे. त्याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. सन्मानाचे पद मिळाले तर कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे. दोन वेळा विधानसभा निवडणूक लढविली आहे. आगामी विधानसभा निवडणूक लढविणार नाही. - सावकर मादनाईक

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRaju Shettyराजू शेट्टी