मायक्रो एटीएम सुविधांचा बचत गटानी लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:25 IST2021-09-18T04:25:31+5:302021-09-18T04:25:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सावरवाडी : नव्या बदलत्या युगात ग्रामीण भागातील महिला बचत गटाच्या आर्थिक उन्नतीकरिता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून ...

The savings group should take advantage of micro ATM facilities | मायक्रो एटीएम सुविधांचा बचत गटानी लाभ घ्यावा

मायक्रो एटीएम सुविधांचा बचत गटानी लाभ घ्यावा

लोकमत न्यूज नेटवर्क

सावरवाडी : नव्या बदलत्या युगात ग्रामीण भागातील महिला बचत गटाच्या आर्थिक उन्नतीकरिता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सहकारी संस्थातर्फ सुरू असलेल्या मायक्रो एटीएम सुविधाचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हा मध्यवती सहकारी बँकेचे निरीक्षक सी. आर. पोवार यांनी केले .

सावरवाडी (ता. करवीर) येथील पीएन पाटील विकास सेवा संस्था व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या मायक्रो एटीएम केंद्राच्या आयोजित शुभारंभप्रसंगी पोवार बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब खोपकर होते.

प्रारंभी विविध मान्यवरांच्या हस्ते मायक्रो एटीएम केंद्राचा संस्थेच्या सभागृहात शुभारंभ करण्यात आला.

यावेळी बाबुराव नलवडे, सुरेश दिवसे, शिवाजी जाधव, सरदार जाधव, यशवंत कंदले, श्यामराव जाधव, उपसरपंच आनंदी नलवडे, राणी दिवसे, युवा नेते नीलेश खोपकर, ईश्वरा नलवडे, रामचंद्र जाधव, सुनील साळोखे, विष्णुपंत तळेकर, बाळासाहेब दिवसे यांच्यासह ग्रामस्थ व बचत गटाच्या महिला उपस्थितीत होते.

फोटो ओळ = सावरवाडी (ता. करवीर) येथील पी.एन. पाटील विकास सेवा संस्थातर्फे नव्याने सुरू करण्यात आलेल्या मायक्रो एटीएम सुविधांचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी केडीसीसी बँकेचे निरीक्षक सी. आर. पोवार, कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब खोपकर, सुरेश दिवसे आदी मान्यवर उपस्थितीत होते.

Web Title: The savings group should take advantage of micro ATM facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.