रंकाळा तलाव वाचवा, हिंदुत्ववादी संघटनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:16 IST2021-07-03T04:16:35+5:302021-07-03T04:16:35+5:30
कोल्हापूर : शहराच्या वैभवात भर घालणारा ऐतिहासिक रंकाळा तलाव सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडला असून या तलावाच्या संवर्धनाकडे तातडीने लक्ष ...

रंकाळा तलाव वाचवा, हिंदुत्ववादी संघटनेची मागणी
कोल्हापूर : शहराच्या वैभवात भर घालणारा ऐतिहासिक रंकाळा तलाव सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडला असून या तलावाच्या संवर्धनाकडे तातडीने लक्ष घालावे, अशा मागणीचे निवेदन हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने शुक्रवारी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना देण्यात आले.
तलावात सांडपाणी मिसळण्याचे प्रमाण घटलेले नाही. परिसरात गवत, झुडपे वाढली आहेत, बाल उद्यानातील खेळण्यांची मोडतोड झाल्याने ती धोकादायक बनली आहेत. तसेच ओपन जीममधील साहित्याचीही मोडतोड करण्यात आली आहे. येथील उपद्रवी लोकांचा बंदोबस्त करावा. संरक्षक भिंतींची दुरुस्ती करून प्राण्यांचा वावर थांबवावा, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
यावर प्रशासक डॉ. बलकवडे यांनी रंकाळा तलावाला भेट देऊन पाहणी करण्यात येईल. तसेच सर्व त्रुटी दूर करण्याच आश्वासन शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळामध्ये शिवसेना उपजिल्हा प्रमुख संभाजीराव भोकरे, किशोर घाटगे, राजू यादव, शिवानंद स्वामी, गणेश मेटील, राजू सांगावकर आदींचा सहभाग होता.