सोवनी यांनी पटकावला ‘श्रीराम गोल्फ कप’
By Admin | Updated: March 9, 2015 23:51 IST2015-03-09T23:24:12+5:302015-03-09T23:51:28+5:30
विजेत्यांना पारितोषिक वितरण केसर झंवर, स्टेशन कमांडर कर्नल राहुल वर्मा, निवृत्त कर्नल विजय गायकवाड यांच्या हस्ते झाले.

सोवनी यांनी पटकावला ‘श्रीराम गोल्फ कप’
कोल्हापूर : झंवर गु्रप आॅफ इंडस्ट्रीजतर्फे कोल्हापुरात प्रथमच घेतलेल्या ‘श्रीराम कप गोल्फ’ स्पर्धेचे अजिंक्यपद सी. पी. सोवनी यांनी पटकाविले, तर शेखर कर्नावट हे उपविजेते ठरले. टेंबलाई परिसरातील आर्मी गोल्फ कोर्टवर झालेल्या या स्पर्धेत कोल्हापूर, पुणे, बेळगाव येथील ६० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ‘स्टेबल फोर्ड फॉरमॅट’ या प्रकारची स्पर्धा झाली.
विजेत्यांना पारितोषिक वितरण केसर झंवर, स्टेशन कमांडर कर्नल राहुल वर्मा, निवृत्त कर्नल विजय गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी कर्नल जे. के. रॉक, कर्नल सच्चन, कर्नल पांडेयन, झंवर उद्योग समूहाचे अध्यक्ष रामप्रताप झंवर, अनिल पाटील, इंद्रजित नागेशकर, नरेंद्र झंवर, निरज झंवर, रोहन झंवर, आदी उपस्थित होते.
सविस्तर निकाल - ‘श्रीराम कप’ विजेते : सी. पी. सोवनी, डॉ. शेखर कर्नावट, बेस्ट ग्रास विनर : कर्नल डीएसडी मंडलिक, उपविजेता निकित दोशी, ९ होल विनर : मेजर संजय शिंदे, १९ होल विनर : देवराज निंबाळकर, मॅक्सीमम पास : रोशन जोसेफ, मॅक्सीमम बडीज : विक्रांत पिलानी, स्टेटस्ट ड्राईव्ह : दत्तू सरोदे, निअरस्ट टू पीन : नरेंद्र झंवर, रनडम ९ होल : प्रभाकर पाटील.