शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सतेज यांचे आव्हान पी.एन. यांच्या पथ्यावर

By admin | Updated: January 30, 2015 00:15 IST

‘गोकुळ’चे रणांगण : सत्तारूढ गटात दबदबा कायम; पॅनेल निश्चितीतही राहणार वरचष्मा

विश्वास पाटील - कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ (गोकुळ)च्या निवडणुकीत माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आव्हान दिल्यामुळे सत्तारूढ गटातील ज्येष्ठ नेते माजी आमदार पी. एन. पाटील यांचा दबदबा पुन्हा वाढला आहे. पी. एन. पाटील, सतेज पाटील व माजी खासदार सदाशिवराव मंडलिक हे एकत्र आले तर संघातील राजकारण बदलू शकते, हे माहीत असल्याने आमदार महादेवराव महाडिक ‘पी. एन. साहेब’च गोकुळचे नेते असल्याची भाषा बोलू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर काही दिवस एका ज्येष्ठ संचालकांच्या ताराबाई पार्कातील बंगल्यात आमदार महाडिक यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. तिथे पी.एन.ना वगळून स्वतंत्र पॅनेल करण्याची चर्चा झाली; परंतु त्यासंबंधी आता लगेच घाई करायला नको. विधानसभा निवडणुकीत काय होते ते पाहून नंतर ठरवू, असे ठरले. परंतु, ज्यांच्या घरी ही बैठक झाली, त्यांनीच पी. एन. पाटील यांना या बैठकीचा सर्व वृत्तांत दिला. पी. एन. आमदार असले किंवा नसले तरी गेली २५ वर्षे त्यांचा राजकीय दबदबा कायम आहे. काँग्रेसचे एकनिष्ठ नेते हे त्याचे महत्त्वाचे कारण आहे. राज्यातील सत्तेचे ‘गोकुळ’ला संरक्षण मिळवून देण्यात पी. एन. यांचा वाटा मोठा राहिला. पी. एन. ‘गोकुळ’चे नेते आहेत, म्हणूनच हा संघ काँग्रेसच्या ताब्यात आहे, असे मानले गेले. आता राज्यात सत्ता नाही. पी. एन. विधानसभेलाही पराभूत झाले. त्यामुळे पी. एन. हेच संघाचे नेते आहेत, असे बोलण्यात मोठेपण द्यायचे. परंतु, प्रत्यक्षात त्यांना संचालकांच्या कमीत-कमी जागा देऊन बेदखल करण्याची व्यूहरचना होती. त्याला सतेज पाटील यांच्या मोर्चेबांधणीमुळे शह बसला आहे. सत्तारूढ गटाची संघाच्या सत्तेवर आजही चांगली मांड आहे हे खरे असले तरी काहीजणांबद्दल लोकांतही कमालीची नाराजी आहे. कारण या संचालकांनी विधानसभा, जिल्हा परिषद, साखर कारखाना आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत परस्परविरोधी भूमिका घेऊन अनेकांना दुखविले आहे. या सगळ्याचा राग म्हणून लोक काहीजणांना धडा शिकविण्याच्या तयारीत आहेत. अशा स्थितीत सत्तारूढ आघाडी कशी एकसंध राहील, असाच प्रयत्न आहे. त्यामुळेच पी. एन. जे म्हणतील, तेच या वेळेलाही पॅनेल निश्चितीत खरे होणार आहे.खरा ‘राखणदार’दिवंगत आनंदराव पाटील-चुयेकर हे संघाच्या स्थापनेपासून सलग ४४ वर्षे संचालक राहिले. चुयेकर आहेत म्हणून संघ चांगला आहे, अशी जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादकांत भावना राहिली. त्यामुळे सत्ता कुणाचीही आली तरी चुयेकर संघाचे ‘राखणदार’ म्हणून सत्तेत राहिले. दिवंगत संचालक राजकुमार हत्तरकी यांनीही तब्बल ३५ वर्षे संचालकपद भूषविले. आता या दोघांच्या वारसदारांना सत्तारुढ पॅनेलमध्ये घेण्याच्या हालचाली आहेत.सतेज पाटील यांनी स्वतंत्र पॅनेल केल्यास त्यांना मानणारे संचालक बाबासाहेब चौगले यांना सत्तारूढ गटातून वगळले जाऊ शकते. ही जागाही आपल्याला हवी, असा पी. एन. यांचा आग्रह आहे. करवीर तालुक्यातून पाच संचालक आहेत. तेवढेच ते राहिले पाहिजेत, असा त्यांचा प्रयत्न आहे. महाडिक यांना ही जागा राधानगरी तालुक्यातील दूधगंगा काठ अथवा हातकणंगले तालुक्यास देण्याचा प्रयत्न आहे. आमदार अमल महाडिक यांनी ‘गोकुळ’ची निवडणूक लढविण्यास स्वत:हून नकार दिल्याचे समजते. त्यामुळे त्यांच्या नावे दूध संस्थेचा ठरावही करण्यात आलेला नाही.नवे वारसदार..अरुण नरके यांच्याऐवजी संदीप नरके यांना पॅनेलमध्ये संधी दिली जावी, असा पी. एन. यांचा आग्रह होता व आहे. तसे नरके यांना त्यांनी जाहीरपणे बोलूनही दाखविले आहे; परंतु अरुण नरके यास तयार नाहीत. निवासराव पाटील यांच्याऐवजी त्यांचा मुलगा उदय यांना सत्तारुढ पॅनेलमधून संधी दिली जाऊ शकते.कोण किती वर्षे सत्तेतअरुण नरके : ४० वर्षेरणजित पाटील : ४० वर्षेरवींद्र पांडुरंग आपटे : ३५ वर्षेअरुण डोंगळे : ३० वर्षेविश्वास नारायण पाटील : ३५ वर्षेदिलीप माने : १५ वर्षेसुरेश पाटील : १२ वर्षेनिवासराव पाटील : १२ वर्षेविश्वास शंकर जाधव : १२ वर्षेदीपक भरमू पाटील : ५ वर्षेधैर्यशील बजरंग देसाई : ५ वर्षेपी. डी. धुंदरे : ५ वर्षेबाबासाहेब चौगले : ५ वर्षेदिनकर कांबळे : ५ वर्षेअरुंधती संजय घाटगे : ५ वर्षेअनुराधा बाबासाहेब पाटील : ५ वर्षेअरुण डोंगळे यांचे चुलते रंगराव आबाजी डोंगळे वभाऊ विजय डोंगळे प्रत्येकी पाच वर्षे सत्तेत