शनिवार पेठेत साडेसात तोळे दागिन्यांवर डल्ला

By Admin | Updated: November 14, 2015 01:15 IST2015-11-14T01:10:45+5:302015-11-14T01:15:06+5:30

शहर उपअधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरील घटना

Saturn Peth sat on a pinnacle of gold ornaments | शनिवार पेठेत साडेसात तोळे दागिन्यांवर डल्ला

शनिवार पेठेत साडेसात तोळे दागिन्यांवर डल्ला

कोल्हापूर : शनिवार पेठ येथे देवघरात लक्ष्मीपूजन केलेल्या सुमारे साडेसात तोळे सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारला. ही घटना शहर उपअधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरील गजबजलेल्या मध्यवस्तीत गुरुवारी सायंकाळी सहा ते रात्री नऊच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी सांगितले, शिवाजी जयसिंग पाटील यांचे जय भवानी चौक, शनिवार पेठ येथे घर आहे. दिवाळीनिमित्त बुधवारी रात्री देवघरात लक्ष्मीपूजन केले होते. यावेळी लक्ष्मीच्या फोटोस नेकलेस, गंठण व दोन अंगठ्या घातल्या होत्या. दुसऱ्या दिवशी गुरुवार असल्याने त्यांनी पूजा उतरली नाही. दरम्यान, रात्री साडेनऊच्या सुमारास देवघरात गेल्यानंतर दागिने गायब असल्याचे दिसले.
दागिने गायब झाल्याचे समजताच पाटील यांनी घरातील लोकांना या प्रकाराची माहिती दिली. दुमजली घरात दिवाळीनिमित्त लोक घरीच होते. त्यामुळे नेमके दागिने कोणी चोरले याबाबत सर्वजण गोंधळून गेले. पाटील यांनी जिन्यातून चोरट्याने देवघरात प्रवेश करून दागिने चोरल्याची फिर्याद लक्ष्मीपुरी पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज आठरे करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Saturn Peth sat on a pinnacle of gold ornaments