शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी तिघे संचालक समाधानी; शौमिका महाडिकच तक्रारखोर - अरुण डोंगळे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 13:14 IST

वाहतूक ठेका, निविदा प्रक्रिया नियमानुसारच 

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत विरोधी आघाडीतून निवडून आलेल्या चारपैकी तीन संचालक राजकारण विरहीत, संघाचे हित पाहून कामकाजात सक्रिय सहभागी आहेत. ते ‘गोकुळ’च्या कामकाजाबाबत समाधानी आहेत, मग एकट्या शौमिका महाडिक यांचीच तक्रार कशी? अशी विचारणा करत वैयक्तिक राजकीय हेतूने प्रेरीत होऊन संघाची बदनामी न करता संघाच्या विकासाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी पत्रकातून केले.डोंगळे म्हणाले, संघात कोणताही गैरकारभार झालेला नाही, दूध उत्पादक शेतकरी केंद्रबिंदू मानूनच कामकाज सुरू आहे. शौमिका महाडिक यांनी हेतूपुरस्सर चाचणी लेखापरीक्षणाची मागणी केल्यानेच आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली पण कारभाराचे अवलोकन करूनच लेखापरीक्षकांनी ‘अ’ वर्ग दिला. शेतकरी व ‘गोकुळ’चा सर्वांगीण विकास व्हावा, म्हणून सत्ताधारी आघाडीचे नेते व संचालक कार्यरत आहेत. महाडिक यांच्या चांगल्या सूचनांचे आम्ही स्वागतच करतो.                                                                                   कमीत कमी दरानेच ठेकासंघ कार्यक्षेत्रातील कुस्ती व इतर खेळांसाठी सामाजिक बांधीलकीच्या भावनेने प्रचलित पद्धतीनुसार देणगी दिलेली आहे. वेगवेगळी सीलबंद टेंडर्स संचालक मंडळाच्या सभेत उघडली जातात, त्यावर त्यांच्या सह्या असतात आणि कमीत कमी दरानेच ठेका दिला जातो, असे अध्यक्ष डोंगळे यांनी म्हटले आहे.‘लम्पी’ला आवर घालण्यात ‘गोकुळ’च पुढे‘लम्पी आजार प्रतिबंधित उपाययोजना आखण्यात गोकुळ दूध संघाने कुठेही हलगर्जीपणा केला नाही. लसीकरणासह उपचारात कुठेही कमी पडलेलो नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन उपाययोजनेसह शेतकऱ्यांना मदतीची मागणी केली. ‘लम्पी’ला आवर घालण्यात ‘गोकुळ’चे पुढे असल्याचे डोंगळे यांनी म्हटले आहे.

हिताची भूमिका घ्यासंघाच्या तालुकानिहाय संपर्क सभेचे निमंत्रण सर्व संचालकासोबत शौमिका महाडिक यांनाही दिले होते; परंतु त्या एकाही संपर्क सभेला हजर न राहता वैयक्तिक दौरा काढणार असल्याचे समजते. विरोधाचा दृष्टिकोन बाजूला ठेवून संघ हिताची भूमिका घ्यावी असा सल्लाही डोंगळे यांनी दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul Milkगोकुळ