सत्वशील माने भाजपच्या वाटेवर

By Admin | Updated: June 1, 2014 01:22 IST2014-06-01T01:19:37+5:302014-06-01T01:22:20+5:30

राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी चर्चेचा शब्दच खोटा

Satgavit Mane on the way of BJP | सत्वशील माने भाजपच्या वाटेवर

सत्वशील माने भाजपच्या वाटेवर

खोची : माजी खासदार निवेदिता माने यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी विधान परिषदेवर संधी देण्याची चर्चा झाली होती; परंतु राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी चर्चेचा शब्दच खोटा ठरवित निवेदिता माने यांचे नाव विचारात घेतले नाही. त्यामुळे निवेदिता माने यांचे पुत्र सत्वशील माने यांनी भाजपमध्ये जाण्याचा इशारा दिला आहे. याचा फटका हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला बसून पक्षाला खिंडार पडेल असे चित्र आहे. सत्वशील माने यांची भूमिका बहुतांश कार्यकर्त्यांना योग्य वाटत असल्याच्या प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. निवेदिता माने हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढण्यास तयार होत्या; परंतु हा मतदारसंघच राष्ट्रवादीने कॉँग्रेसला सोडला. तत्पूर्वी मुंबई येथे झालेल्या बैठकीत निवेदिता माने यांना विधानपरिषदेवर घेण्याचा शब्द दिला होता. तेव्हांपासून माने गटाचे कार्यकर्ते या घोषणेची वाट पहात होते. परंतु, चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेल्या जागांसाठी नावे निश्चित करण्यात आली. या सर्व घडामोडी चालू असताना निवेदिता माने, धैर्यशील माने, सत्वशील माने मुंबईत होते. अंतिम क्षणाला सहाजणांमध्ये नाव नसल्याची माहिती मिळताच सत्वशील माने तातडीने तेथून बाहेर पडले. राष्ट्रवादीने फसवणूक केल्याने त्यांनी पक्षाला गटाची ताकद दाखविण्याची भूमिका घेत भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले. भाजपच्या नेत्यांची त्यांच्याबरोबर फोनवरून चर्चाही केली. सत्वशील यांचा हा निर्णय माने गटांतील बहुतांश कार्यकर्त्यांना मान्य असून या निर्णयामुळे तालुक्यातील राष्ट्रवादीचे अस्तित्व नावापुरतेच राहील. इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळ मतदारसंघात पक्षाला मोठे भगदाड पडेल. इचलकरंजी पालिका, हातकणंगले पंचायत समितीमध्येही याचे पडसाद उमटू लागण्यास सुरुवात झाली आहे.

Web Title: Satgavit Mane on the way of BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.