शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळाच्या विस्तारात ‘सतेज’ हेच सरस, अडचणीच्या काळात दिलेल्या उभारीचे फळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 12:46 IST

राज्यमंत्री मंत्रिमंडळाच्या विस्तारात संधी मिळण्यासाठी आमदार सतेज पाटील व आमदार पी. एन. पाटील यांच्यात चांगलीच रस्सीखेच होती. दोघांनीही आपापली राजकीय ताकद वापरून शेवटपर्यंत निकराचे प्रयत्न केले; मात्र सतेज पाटीलच सरस ठरले. अडचणीच्या काळात त्यांनी काँग्रेसला दिलेल्या उभारीचे फळ पक्षाने दिले.

ठळक मुद्देमंत्रिमंडळाच्या विस्तारात ‘सतेज’ हेच सरसअडचणीच्या काळात कॉँग्रेसला दिलेल्या उभारीचे फळ

कोल्हापूर : राज्यमंत्री मंत्रिमंडळाच्या विस्तारात संधी मिळण्यासाठी आमदार सतेज पाटील व आमदार पी. एन. पाटील यांच्यात चांगलीच रस्सीखेच होती. दोघांनीही आपापली राजकीय ताकद वापरून शेवटपर्यंत निकराचे प्रयत्न केले; मात्र सतेज पाटीलच सरस ठरले. अडचणीच्या काळात त्यांनी काँग्रेसला दिलेल्या उभारीचे फळ पक्षाने दिले.उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कोल्हापूरला प्रतिनिधित्व मिळणार, हे निश्चित होते. जिल्ह्यात कॉँग्रेसचे चार आमदार आहेत; मात्र मंत्रिपदासाठी पी. एन. पाटील व सतेज पाटील यांच्यातच चुरस होती. पी. एन. पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मल्लिकार्जुन खरगे यांच्या माध्यमातून सर्व ताकद पणाला लावली होती.

निष्ठावंत म्हणून त्यांची काँग्रेसमध्ये ओळख आहे. ज्येष्ठत्व आणि निष्ठा या बळावर संधी मिळेल, असे त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत होते. दुसऱ्या बाजूला सतेज पाटील यांनी यापूर्वी राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. गेले पाच वर्षांत विशेषत: लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना शिवसेनेतून मोठी आॅफर होती; मात्र काँग्रेससोबत राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

विधानसभेच्या तोंडावर प्रकाश आवाडे यांनी जिल्हाध्यक्ष पद सोडले. ही जबाबदारी सतेज पाटील यांच्या खांद्यावर सोपविली. प्रदेशाध्यक्षांचा विश्वास सार्थ ठरवीत जिल्ह्यातील सहापैकी चार आमदार निवडून आणले. महापालिकेची सत्ता ताब्यात ठेवल्याने त्यांना बळ देण्यासाठीच मंत्रिपदी वर्णी लागली.‘कॅबिनेट’ची हुलकावणीराज्यमंत्री म्हणून त्यांनी प्रभावीपणे काम केले होते. त्यामुळे यावेळेला कॅबिनेटपदी बढती मिळेल, असे अपेक्षित होते. मात्र विधानपरिषदचे सदस्य, आठ कॅबिनेट मंत्री पदांमुळे हुलकावणी मिळाल्याचे समजते. 

 

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलcongressकाँग्रेसministerमंत्रीkolhapurकोल्हापूर