सतेज पाटील यांची निवेदिता माने यांच्याशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:25 IST2021-04-07T04:25:59+5:302021-04-07T04:25:59+5:30

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारी माजी खासदार निवेदिता माने यांच्याशी चर्चा केली. ...

Satej Patil's discussion with Nivedita Mane | सतेज पाटील यांची निवेदिता माने यांच्याशी चर्चा

सतेज पाटील यांची निवेदिता माने यांच्याशी चर्चा

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारी माजी खासदार निवेदिता माने यांच्याशी चर्चा केली. निवडणुकीत विरोधी शाहू आघाडीसोबत राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

‘गोकुळ’च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही आघाडीच्या नेत्यांच्या गाठीभेटीचा जोर सुरू आहे. पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील आमदार, माजी आमदारांच्या गाठीभेटी घेऊन विरोधी आघाडीसोबत राहण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांनी खासदार धैर्यशील माने यांची भेट घेतली नाही. त्यानंतर सोमवारी सत्तारूढ गटाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी खासदार धैर्यशील माने व माजी खासदार निवेदिता माने यांची भेट घेतली. त्यानंतर विरोधी आघाडीकडून हालचाली गतीमान झाल्या. पालकमंत्री सतेज पाटील यांनी निवेदिता माने यांच्याशी संपर्क साधून विरोधी आघाडीसोबत राहण्याचे आवाहन केल्याचे समजते.

Web Title: Satej Patil's discussion with Nivedita Mane