शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: सतेज पाटील भाजप, राजेश क्षीरसागरांच्या बुथवर गेले, नाचणारे कार्यकर्तेही थबकले-video

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 19:19 IST

क्षीरसागर दवाखान्यातून मिरवणुकीत

कोल्हापूर : विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने राजकीय नेत्यांमधील खिलाडूपणा शनिवारी रात्री पापाची तिकटी परिसराने अनुभवला. काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार मालोजीराजे हे भाजपसह राजेश क्षीरसागर यांच्या स्वागत कक्षात गेल्याने मिरवणुकीत नाचणारे कार्यकर्तेही काही मिनिटे थबकले. या दोघांनीही सर्वपक्षीय स्वागत कक्षात हजेरी लावली. मात्र, सत्यजीत कदम यांच्या कक्षात जाणे टाळले.महाद्वार रोड, पापाची तिकटी ते गंगावेश मार्गावर महापालिका, पोलिस दल, शरदचंद्र पवार पक्ष, उद्धवसेना, मनसे, भाजप, आप, वाहतूक सेना, सत्यजीत कदम, छत्रपती परिवार, शिंदेसेना, रामभाऊ चव्हाण फाउंडेशन, सकल हिंदू समाज, कोल्हापूर सराफ संघ, बंगाली कारागीर असोसिएशन, नवशक्ती यांनी स्वागत कक्ष उभारले होते.महापालिका कक्षात सतेज पाटील आल्यानंतर त्यांनी काही काळ मंडळांना मानाचे नारळ दिले. त्यानंतर, मालोजीराजे यांच्यासह ते सर्वच स्वागत कक्षात गेले. राजेश क्षीरसागर यांच्या कक्षात गेल्यानंतर क्षीरसागर यांनी हात पुढे केला. तेव्हा हातात हात घेतल्यानंतर तब्येतीची काळजी घ्या, असा सल्ला सतेज यांनी राजेश यांना दिला. कारण क्षीरसागर हे दोन दिवस दवाखान्यात होते. तेथूनच ते थेट मिरवणुकीत आले होते.यानंतर, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हाक मारल्यानंतर ‘तुम्ही मूळ भाजपचे आहात, मी येतो,’ असे म्हणत सतेज पाटील वर चढले. पाठोपाठ मालोजीराजेही गेले. जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी या दोघांचे स्वागत केले. शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी स्वागत केले.नेते मंडळीचे नृत्य आणि सारथ्यमालाेजीराजे यांनी पीटीएमच्या मिरवणुकीचे उद्घाटन केल्यानंतर डीजेच्या तालावर नृत्य केले आणि पिवळा निळा झेंडाही फिरवला. सतेज पाटील यांनीही नृत्याचा आनंद घेतला, तर राजेश क्षीरसागर मिरवणुकीत आल्यानंतर मित्रप्रेम मंडळाच्या ट्रॅक्टरचे सारथ्यही केले.

काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी साउंड सिस्टमच्या तालावर ठेका धरला

आमदार राजेश क्षीरसागर यांनी गणेशमूर्ती नेणाऱ्या ट्रॅक्टरचे सारथ्य केले