भारतीय तलवारबाजी महासंघाच्या उपाध्यक्षपदी सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:29 IST2021-08-21T04:29:54+5:302021-08-21T04:29:54+5:30

कोल्हापूर : रायपूर (छतीसगड)येथे शुक्रवारी झालेल्या भारतीय तलवारबाजी महासंघाच्या विशेष सर्वसाधारण सभेत उत्तर प्रदेशचे आमदार पंकजसिंह यांची अध्यक्षपदी, ...

Satej Patil as Vice President of Indian Fencing Federation | भारतीय तलवारबाजी महासंघाच्या उपाध्यक्षपदी सतेज पाटील

भारतीय तलवारबाजी महासंघाच्या उपाध्यक्षपदी सतेज पाटील

कोल्हापूर : रायपूर (छतीसगड)येथे शुक्रवारी झालेल्या भारतीय तलवारबाजी महासंघाच्या विशेष सर्वसाधारण सभेत उत्तर प्रदेशचे आमदार पंकजसिंह यांची अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

अन्य निवडींमध्ये भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे सचिव राजीव मेहता, छत्तीसगड ऑलिम्पिक महासंघाचे सचिव बशीर अहमद (कोषाध्यक्ष), महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डाॅ. उदय डोंगरे (सहसचिव), यांचा समावेश आहे. या सभेत टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रथमच तलवारबाजी खेळाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भवानी देवीला महासंघाच्या वतीने दहा लाख रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. गृहराज्यमंत्री सतेज पाटील व डाॅ. उदय डोंगरे यांच्या निवडीबद्दल राज्य तलवारबाजी संघटनेचे मुख्य सल्लागार अशोक दुधारे, कार्याध्यक्ष प्रकाश काटुळे, उपाध्यक्ष शेषनारायण लोंढे, कोषाध्यक्ष राजकुमार सोमवंशी, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष एस.पी. जवळकर, मंजू खंडेलवाल, डाॅ. दिनेश वंजारे, क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे आदींनी आनंद व्यक्त केला.

Web Title: Satej Patil as Vice President of Indian Fencing Federation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.