शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सतेज पाटील काँग्रेसच्या राजकीय व्यवहार समितीत, सरचिटणीसपदी कोल्हापूर जिल्ह्यातून तिघांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 15:26 IST

सूर्यकांत पाटील-बुदिहाळकर, इचलकरंजीचे शशांक बावचकर आणि माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांचा समावेश

कोल्हापूर : विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांची अखिल भारतीय काँग्रेसने पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीवर नियुक्ती केली आहे.या संदर्भातील घोषणा अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी मंगळवारी रात्री केली. आमदार पाटील गेली चार-पाच वर्षे राज्य कार्यकारी समितीतही ते काम करत आहेत. राज्याच्या राजकारणातील त्यांचा प्रभाव लक्षात घेऊन पक्षाने या दोन्ही समितीत त्यांना पुन्हा स्थान दिले आहे.प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, विजय वड्डेटीवार यांच्यानंतर पाचव्या क्रमाकांवर सतेज पाटील यांना या यादीत स्थान मिळाले आहे. ‘पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचा चेहरा’ म्हणून पक्षाला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाची संधीही त्यांना येत्या अधिवेशनात मिळण्याची शक्यता आहे.दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीवर सरचिटणीस म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातून तिघांना संधी मिळाली. सूर्यकांत पाटील-बुदिहाळकर, इचलकरंजीचे शशांक बावचकर आणि माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांचा त्यामध्ये समावेश आहे. तिघेही काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.बुदिहाळकर पाटील यांचे घराणेच काँग्रेसमय आहे. ते शिवाजी विद्यापीठाच्या स्टुडंट कौन्सिलपासून काँग्रेसशी जोडले गेले आहेत. त्यांनी यापूर्वी युवक काँग्रेस, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून राजीव गांधी यांच्यासोबत काम केले आहे. मुल्लाणी आता पक्षाचे प्रदेश सचिव होते. त्यांनीही छत्तीसगड, गोवा, कर्नाटक, जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीत पक्ष निरीक्षक म्हणून काम केले आहे. युथ काँग्रेसपासून पक्षाचे ते सक्रिय कार्यकर्ते आहेत. मौलाना आझाद महामंडळाचे संचालक म्हणून पक्षाने त्यांना संधी दिली होती.बावचकर हे गेली चार वर्षे प्रदेश सचिव होते. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सहप्रभारी व प्रभारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले. सध्या ते सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा काँग्रेस निरीक्षक आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत त्यांनी उत्तम काम केले. सन १९८१ पासून पक्षामध्ये ते कार्यरत असून, दहा वर्षे नगरसेवक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.