‘गोकूळ’ तर्फे सतेज पाटील यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:27 IST2021-08-23T04:27:28+5:302021-08-23T04:27:28+5:30

कोल्हापूर : भारतीय तलवारबाजी महासंघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पालकमंत्री सतेज पाटील यांचा सत्कार ‘गोकूळ’च्या वतीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ...

Satej Patil felicitated by 'Gokul' | ‘गोकूळ’ तर्फे सतेज पाटील यांचा सत्कार

‘गोकूळ’ तर्फे सतेज पाटील यांचा सत्कार

कोल्हापूर : भारतीय तलवारबाजी महासंघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पालकमंत्री सतेज पाटील यांचा सत्कार ‘गोकूळ’च्या वतीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रकारातील खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी करण्यासाठी नक्कीच प्रोत्साहन देऊ. भविष्यात या खेळातील जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय खेळाडू जिल्ह्यात तयार करण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही मंत्री पाटील यांनी दिली. यावेळी आमदार राजेश पाटील, ‘गोकूळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, संचालक अरुण डोंगळे, अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासाहेब खाडे, अंबरिश घाटगे, अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर आदी उपस्थित हाेते.

फोटो ओळी : भारतीय तलवारबाजी महासंघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पालकमंत्री सतेज पाटील यांचा सत्कार ‘गोकूळ’च्या वतीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अरुण डोंगळे, राजेश पाटील, विश्वास पाटील आदी उपस्थित हाेते. (फोटो-२२०८२०२१-काेल-सतेज पाटील)

Web Title: Satej Patil felicitated by 'Gokul'