शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आरोप-प्रत्यारोपानंतर सतेज पाटील-चंद्रकांत पाटील आमने-सामने; अन्..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 15:59 IST

अगदी वैयक्तीक पातळीवर टीका टीप्पणी सुरु असल्याने नेत्यांमध्ये वाक्ययुद्ध रंगले आहे. या अशा स्थितीत आज, बुधवारी पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे शहरातील भेंडे गल्लीत काही क्षणांसाठी आमने-सामने आले.

कोल्हापूर : ‘कोल्हापूर उत्तर’ पोटनिवडणुकीच्या प्रचारा दरम्यान महाविकास आघाडी आणि भाजपमधील नेत्यांच्या आरोप - प्रत्यारोप आणि जोरदार इर्ष्येने सध्या राजकीय वातावरण तापले आहे. अगदी वैयक्तीक पातळीवर टीका टीप्पणी सुरु असल्याने नेत्यांमध्ये वाक्ययुद्ध रंगले आहे. या अशा स्थितीत आज, बुधवारी पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे शहरातील भेंडे गल्लीत काही क्षणांसाठी आमने-सामने आले. त्यांनी एकमेकांना नमस्कार केला अन् त्यांच्यात हास्य फुलले.भेंडे गल्लीतील करवीर संस्थान मठात स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या दर्शनासाठी राजकीय, सामाजिक आदी क्षेत्रातील मान्यवर सकाळी आले होते. महास्वामींचे दर्शन घेऊन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कार्यकर्त्यांसह भेंडे गल्लीतून बाहेर पडत असताना पालकमंत्री सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे, माजी नगरसेवक राजू लाटकर त्याठिकाणी आले.लाटकर यांनी चंद्रकांत पाटील यांना ‘दादा, जय जिनेंद्र’ असे म्हणत नमस्कार केला. पाटील यांनीही त्यांना नमस्कार केला. त्यावेळी लाटकर यांच्या मागे असलेल्या पालकमंत्री पाटील यांनी ‘दादा, नमस्कार आम्ही इकडे आहोत’, असे म्हणत प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे लक्ष वेधले. त्यावर त्यांनी देखील पालकमंत्री पाटील यांना नमस्कार करत ‘आम्हीही इकडे आहोत’, असे म्हणताच या दोघांसह उपस्थितांमध्ये हास्य फुलले. काही क्षणांच्या भेटीनंतर हे दोन्ही नेते तेथून रवाना झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभाSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलchandrakant patilचंद्रकांत पाटील