केर्लीजवळ अपघातात सातारचा तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 17:23 IST2017-10-09T17:23:17+5:302017-10-09T17:23:17+5:30
कोल्हापूर-पन्हाळा मार्गावरील केर्लीजवळ झालेल्या अपघातात शशिकांत जगन्नाथ रसाळ (रा. बोरखळ, जि. सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी आहे. जखमी हा सातारा जिल्हयातील असून त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

केर्लीजवळ अपघातात सातारचा तरुण ठार
कोल्हापूर,9 : कोल्हापूर-पन्हाळा मार्गावरील केर्लीजवळ झालेल्या अपघातात शशिकांत जगन्नाथ रसाळ (रा. बोरखळ, जि. सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी आहे. जखमी हा सातारा जिल्हयातील असून त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रजपुतवाडीवळ दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. या धडकेत मोटरसायकल चालक रसाळ हे रस्त्याच्या बाजूला पडले त्याचवेळी दुसऱ्या बाजूने येणाऱ्या ट्रकच्या खाली येवून त्यांचा जागीच मृत्यू झाला. हेल्मेट असूनही दुर्देवाने त्याचा मृत्यू झाला.
या अपघातानंतर ट्रक चालक ट्रकसह फरार झाला आहे. रसाळ माध्यमिक शिक्षक असल्याचे समजते. त्याच्यासोबत असणाऱ्या शाळेतील शिपाई याला कोल्हापूरातील सीपीआर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.