शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : मुलीच्या मृत्यूचा विमा मिळवून देण्याच्या बहाण्याने वडिलांची फसवणूक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 15:55 IST

मुलीच्या आकस्मित मृत्यूबद्दल पोलीस अधिकाऱ्यांकडून विमा निधी मिळवून देण्याचे अमिष दाखवून वडिलांची ५८ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमुलीच्या मृत्यूचा विमा मिळवून देण्याच्या बहाण्याने वडिलांची फसवणूक ५८ हजार रुपयांची फसवणूक

सातारा : मुलीच्या आकस्मित मृत्यूबद्दल पोलीस अधिकाऱ्यांकडून विमा निधी मिळवून देण्याचे अमिष दाखवून वडिलांची ५८ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, बाळू व्यंकट लोहार (वय ५१ रा. सासपडे, ता. सातारा) यांची मुलगी स्नेहल हिचा मृत्यू झाला. त्यांच्या गावातील पंकज मोहन यादव (वय २६) याने मुलीच्या मृत्यूची भरपाई म्हणून आकस्मित मयत विमा निधीतून बोरगाव पोलीस ठाण्याच्या साहेबांकडून २ लाख ३० हजार हजार रुपये मिळवून देतो, असे सांगून फेडरल बँकेत खाते काढण्यासाठी तीस हजार रुपये घेतले.

विमा निधीचा २ लाख ३० हजारांचा चेक बँक आॅफ महाराष्ट्र सातारा शाखेत जमा केला, असे सांगून काम करण्यासाठी पाच हजार रुपये घेतले. त्यानंतर स्टॅम्प पेपर व मयत विमा प्रक्रियेसाठी १८ हजार रुपये घेतले.

मुलगा गणेश याला पाटण येथे आकस्मित मयत विमा निधीचा ५३ हजार रुपयांचा चेक भरल्याची खोटी बतावणी करून स्वत:ला पैशाची गरज असल्याची विनवणी केली. त्यानंतर पंकजच्या खात्यावर पाच हजार रुपये खात्यावर जमा केले.

अशाप्रकारे विश्वास संपादन करत वेळोवेळी ५८ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पंकज यादव याला अटक केली आहे. अधिक तपास बी. आर. यादव करीत आहेत. 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस