सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टींना इशारा

By Admin | Updated: May 13, 2017 17:32 IST2017-05-13T17:32:10+5:302017-05-13T17:32:10+5:30

हुजऱ्यांना लगाम घाला अन्यथा बंदोबस्त करू

Satabhau Khot's message to Raju Shetti | सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टींना इशारा

सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टींना इशारा

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. १३ : खासदारांच्या बगलबच्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून बदनामी सुरू केली आहे, या हुजऱ्यांना त्यांनी लगाम घालावा, अन्यथा त्यांचा बंदोबस्त करू, असा इशारा कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ‘स्वाभिमानी’चे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांना दिला.


‘स्वास्थ मंत्रा-२०१७’ या प्रदर्शनाच्या उदघाटनासाठी राज्यमंत्री खोत शनिवारी कोल्हापूरात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
आत्मक्लेष यात्रेबाबत कोण काय म्हणते त्याकडे लक्ष देणार नाही, पण कोणाला आपण यात्रेपासून लांब रहावे असे वाढत असेल तर तसे होईल.

सदाभाऊ मळलेल्या वाटेवरून जाणारा नव्हे तर स्वत:ची वाट निर्माण करणारा कार्यकर्ता आहे. भले पाय रक्तबंबाळ झाले तरी बेहत्तर पण मेहनतीने ती वाट तयार करू, अशा शब्दात त्यांनी पुढील राजकीय दिशा स्पष्ट केली.


शेतकरी चळवळीत वाढलेला मी कार्यकर्ता असून आजही आपल्या अंगावर ४० हून अधिक गुन्हे आहेत, असेही खोत यांनी सांगितले.

Web Title: Satabhau Khot's message to Raju Shetti