सरूडचा आठवडी बाजार व बिरदेव यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:23 IST2021-04-13T04:23:07+5:302021-04-13T04:23:07+5:30

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसारामुळे सरूडचा दर मंगळवारी भरणारा आठवडी बाजार व दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त भरणारी बिरेदवाची यात्रा शासन आदेशानुसार ...

Sarud's weekly market and Birdev yatra canceled | सरूडचा आठवडी बाजार व बिरदेव यात्रा रद्द

सरूडचा आठवडी बाजार व बिरदेव यात्रा रद्द

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसारामुळे सरूडचा दर मंगळवारी भरणारा आठवडी बाजार व दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त भरणारी बिरेदवाची यात्रा शासन आदेशानुसार रद्द करण्यात आल्याची माहिती सरपंच सौ. राजकुंवर पाटील व उपसरपंच भगवान नांगरे यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली आहे.

दरवर्षी गुढीपाडव्यादिवशी सरुडच्या बिरदेवाची यात्रा विविध धार्मिक कार्यक्रमांनी व हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये मोठया उत्साहात पार पडते. परंतु सध्या सरुड गावात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. १ एप्रिलपासून आजअखेर गावात १२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत; तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावात कोरोनाचा आणखी प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासन आदेशानुसार बिरदेवाची यात्रा व मंगळवारचा आठवडी बाजार रद्द करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्यावतीने घेण्यात आला आहे.

Web Title: Sarud's weekly market and Birdev yatra canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.