बांबवडेतील सरूड रोड पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:15 IST2021-07-23T04:15:45+5:302021-07-23T04:15:45+5:30

: बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे सरूड रस्त्यांवरील घरामध्ये पाणी शिरले असून या ठिकाणी एवढे पाणी येण्याची ही पहिलीच ...

Sarud Road in Bombay under water | बांबवडेतील सरूड रोड पाण्याखाली

बांबवडेतील सरूड रोड पाण्याखाली

: बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे सरूड रस्त्यांवरील घरामध्ये पाणी शिरले असून या ठिकाणी एवढे पाणी येण्याची ही पहिलीच घटना आहे.

बांबवडेच्या पूर्वेकडून जाणारा आंबीरा ओढा हा कडवी नदीला मिळतो. परंतु कडवी नदीला तुंबी लागल्याने पाणी बांबवडेमध्ये शिरले आहे. यामुळे बांबवडे कोकरूड हा मार्ग बंद झाला आहे. २००६ सालच्या पुरामध्ये येथे पाणी रस्त्यावर आले होते. परंतु कोणत्याही घरांमध्ये पाणी शिरले नव्हते. प्रशासनाने येथे पाहणी करून लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला दिला आहे.

वाडीचरण येथेही आंबीरा ओढ्याचे पाणी काही घरात शिरले आहे. तसेच डोणोली-चरण हा रस्ता तीन ठिकाणी पाण्याखाली गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. तसेच शित्तुर तर्फ मलकापूर, परखंदळे, सावर्डे व पिशवी साळशी या मार्गावरही पाणी आल्यामुळे या गावांचा संपर्क तुटलेला आहे. या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

फोटो : बांबवडे येथे सरूड रस्त्यावर व घरात शिरलेले पाणी.

Web Title: Sarud Road in Bombay under water