गारगोटीचे सरपंच संदेश भोपळे यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:25 IST2020-12-06T04:25:01+5:302020-12-06T04:25:01+5:30

गारगोटी : येथील लोकनियुक्त सरपंच संदेश भोपळे यांना जातिवाचक शिवीगाळ करून दगडाने मारहाण केल्याप्रकरणी प्रवीण प्रकाश भाट याच्याविरोधात गुन्हा ...

Sarpanch Sandesh Bhopale of Gargoti beaten up | गारगोटीचे सरपंच संदेश भोपळे यांना मारहाण

गारगोटीचे सरपंच संदेश भोपळे यांना मारहाण

गारगोटी : येथील लोकनियुक्त सरपंच संदेश भोपळे यांना जातिवाचक शिवीगाळ करून दगडाने मारहाण केल्याप्रकरणी प्रवीण प्रकाश भाट याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे; तर आपल्यालाही मारहाण झाल्याची तक्रार प्रवीण भाट यानेही केली आहे.

अधिक माहिती अशी, प्रवीण भाट याचा गारगोटी-पाटगाव रस्त्यावर स्टेट बँकेजवळ चायनीज खाद्यपदार्थांचा गाडा आहे. गाडा आणि डिजिटल फलक रस्त्यावर लावलेला असल्याने राहदारीस अडथळा निर्माण होतो, अशी नागरिकांतून तक्रार आली होती. सरपंच भोपळे यांनी त्याला ग्रामपंचायतीच्या सभागृहात बोलावून सांगितले की तो डिजिटल फलक आणि गाडा हद्दीत लावून घ्या, रस्त्यावर लावू नका. याचा मनात राग धरून प्रवीण भाट याने दुपारी चारच्या सुमारास जातिवाचक शिवीगाळ करून दगडाने मारहाण केली; तर प्रवीण भाट याने सरपंच भोपळे यांनी रस्त्यात अडवून विटेने मारहाण केली असल्याची तक्रार दिली आहे.

गारगोटी शहरात रस्त्याच्या दुतर्फा खोक्याचे साम्राज्य वाढत असून वाहने चालविताना आणि पदचाऱ्यांना अडथळा होत आहे. या अतिक्रमणामुळे स्टेट बँक तर दिसतच नाही.

Web Title: Sarpanch Sandesh Bhopale of Gargoti beaten up