सरपंच आरक्षण लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:35 IST2020-12-14T04:35:33+5:302020-12-14T04:35:33+5:30
जयसिंगपूर : राज्य निवडणूक आयोगाने कार्यकाल संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. १५ जानेवारीनंतर सरपंच आरक्षणाचा ...

सरपंच आरक्षण लांबणीवर
जयसिंगपूर : राज्य निवडणूक आयोगाने कार्यकाल संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. १५ जानेवारीनंतर सरपंच आरक्षणाचा निर्णय झाल्यामुळे राजकीय क्षेत्रात ‘कहीं खुशी, कहीं गम’ असे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी करण्याला वेग आला आहे.
जुलै ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल एप्रिल, मेमध्ये वाजणार होता. मात्र, कोरोनाचे संकट कोसळल्याने आणि लॉकडाऊन झाल्याने निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे प्रशासकांची नियुक्ती करावी लागली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य शासनाने कार्यकाल संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याचे ठरविले. त्यातच राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रमही जाहीर केला. उद्या, मंगळवारी सरपंच आरक्षण निश्चित करण्यात येणार होते. या आरक्षणाकडे सर्वच राजकीय नेत्यांच्या नजरा व उत्सुकता असताना निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण काढण्याचा निर्णय झाल्याने राजकीय क्षेत्रात कहीं खुशी, कहीं गम अशी अवस्था निर्माण झाली आहे. एकूणच ऐन थंडीत निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय वातावरण तापले आहे.