देव व पुजारी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून मांगले यांनी देवाच्या अस्तित्वासोबत गुरव व पुजारी वर्गाबद्दल शंका उपस्थित करून भावना दुखावल्या आहेत. मंदिरातील गुरव, पुजारी गावातील सामाजिक,सांस्कृतिक व धार्मिक वातावरण निर्मिती करत असतात. देवाला सातत्याने उजेडात ठेवणारा गुरव समाज आजही स्वतःचे अस्तित्व सामाजिक व राजकीय पटलावर शोधत आहे, अनेक अडचणींना सामोरे जात आहे. गावगुंडांकडून देवस्थान जमिनी बळकावण्याचे काम सुरू आहे. पुजारी हलाखीचे व गरिबीचे जीवन जगत आहे. एकीकडे आम्ही शासन दरबारी हक्कांसाठी लढत आहोत; पण तेथे आम्हाला न्याय मिळत नाही. आमच्यावर सातत्याने अन्याय होत आलाय. आपल्या हिंदूविरोधी भूमिकेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. अभिनेते मांगले यांनी आपले विधान मागे घेऊन जाहीर माफी मागावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सरपंच गुरव यांनी दिला आहे.
वैभव मांगले यांच्या वक्तव्याचा सरपंचांकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:22 IST