जिल्ह्यातील १ हजार २५ ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षणाची मंगळवारी सोडत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:20 IST2020-12-09T04:20:02+5:302020-12-09T04:20:02+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील एक हजार २५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या २०२५पर्यंतच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी (दि. १५) होणार आहे. जिल्ह्यातील १२ तालुक्यांच्या ...

जिल्ह्यातील १ हजार २५ ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षणाची मंगळवारी सोडत
कोल्हापूर : जिल्ह्यातील एक हजार २५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या २०२५पर्यंतच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी (दि. १५) होणार आहे. जिल्ह्यातील १२ तालुक्यांच्या ठिकाणी सकाळी ११ वाजता ही सोडत प्रक्रिया होणार आहे. यापैकी ४३३ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम काही दिवसांत जाहीर होईल तर उर्वरित ग्रामपंचायतींची मुदत अद्याप संपलेली नाही.
जुलै ते डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. मात्र कोरोनामुळे निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने निवडणूक पूर्व प्रक्रियेला वेग आला असून गुरुवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. मंगळवारी दुपारी सन २०२० ते २०२५ या कालावधीसाठी जिल्ह्यातील एक हजार २५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांची आरक्षण सोडत होणार आहे. या पदाचे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण तसेच या प्रत्येक जाती, जमाती व प्रवर्गात मोडणाऱ्या महिला व सर्वसाधारण महिलांची पदे जिल्हानिहाय वाटप करण्यात आली आहेत.
---
तालुका ग्रामपंचायतींची संख्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण
पुरुष महिला पुरुष महिला पुरुष महिला पुरुष महिला
शाहुवाडी : १०६ ६ ७ १ ० १५ १४ ३१ ३२
पन्हाळा : १११ ८ ८ - - १५ १५ ३२ ३३
हातकणंगले : ६० ६ ६ ० १ ८ ८ १६ १५
शिरोळ : ५२ ५ ५ १ १ ७ ७ १३ १३
करवीर : ११८ ९ १० १ ० १६ १६ ३३ ३३
गगनबावडा : २९ ३ २ ० ० ४ ४ ८ ८
राधानगरी : ९८ ६ ५ ० ० १३ १४ ३० ३०
कागल : ८३ ६ ६ ० ० ११ ११ २५ २४
भुदरगड : ९७ ५ ६ ० ० १३ १३ ३० ३०
आजरा : ७३ ४ ४ ० ० १० १० २२ २३
गडहिंग्लज : ८९ ५ ५ ० १ १२ १२ २७ २७
चंदगड :१०९ : ६ ५ १ १ १४ १५ ३४ ३३
एकूण : १०२५ ६९ ६९ ४ ४ १३८ १३९ ३०१ ३०१
------------------
येथे होणार सोडत
शाहूवाडी : पंचायत समिती सभागृह
पन्हाळा : पन्हाळा नगरपरिषद हॉल, मयूर बाग
हातकणंगले : नवीन प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय
शिरोळ : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय
करवीर : बहुद्देशीय हॉल, रमणमळा, कसबा बावडा
गगनबावडा : तहसील कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत
राधानगरी : राजर्षी शाहू सभागृह, तहसील कार्यालय
कागल : बहुद्देशीय सभागृह, तहसील कार्यालयाजवळ
भुदरगड : पंचायत समिती येथील दिनकरराव जाधव सभागृह दुसरा मजला (गारगोटी)
आजरा : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय
गडहिंग्लज : शाहू सभागृह, नगरपरिषद
चंदगड : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय
----
सरपंच पदासाठी आरक्षित प्रवर्ग पदांची संख्या
अनुसूचित जाती : १३३८ (६९ महिला)
अनुसूचित जमाती : ८ (४ महिला)
नागरिकांचा मागास प्रवर्ग : २७७ (१३९ महिला)
सर्वसाधारण : ६०२ (३०१ महिला)
--