शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘सारथी’ कागदावरच! दोन वर्षांत शून्य काम : कोल्हापुरातील मराठा नेत्यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 01:22 IST

कोल्हापूर : ‘सारथी’ संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजा साठी दोन वर्षे झाले तरी कोणतेही काम झालेले नाही. त्यामुळे या संस्थेच्या अध्यक्षपदाचा डॉ. सदानंद मोरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सकल मराठा समाजातर्फे शिष्टमंडळाने पुण्यात सदस्य सचिव शेरेकर यांना भेटून निवेदनाद्वारे केली. त्यामुळे या संस्थेने मराठा समाजासाठी नेमके काय काम केले, हा ...

ठळक मुद्देअध्यक्ष सदानंद मोरे यांच्या राजीनाम्याची मागणी; पुण्यात सदस्य सचिवांना दिले निवेदन

कोल्हापूर : ‘सारथी’ संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजासाठी दोन वर्षे झाले तरी कोणतेही काम झालेले नाही. त्यामुळे या संस्थेच्या अध्यक्षपदाचा डॉ. सदानंद मोरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सकल मराठा समाजातर्फे शिष्टमंडळाने पुण्यात सदस्य सचिव शेरेकर यांना भेटून निवेदनाद्वारे केली. त्यामुळे या संस्थेने मराठा समाजासाठी नेमके काय काम केले, हा मुद्दा ऐरणीवर आला.

सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, दिलीप देसाई यांच्या शिष्टमंडळाने पुण्यात संस्थेच्या कार्यालयात भेट देऊन हे निवेदन सादर केले. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थे (सारथी)च्या अध्यक्षपदी मराठा समाजाचे

प्रतिनिधी व तज्ज्ञ अभ्यासक म्हणून डॉ. मोरे यांची नियुक्ती केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावर्षी २५ जूनला संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले. मराठा समाजाच्या विकासासाठी सुमारे १ हजार कोटींची भरीव आर्थिक तरतूद करून संस्थेचे काम सुरू करणे अपेक्षित होते. या अनुषंगाने सरकारतर्फे मोरे यांनी भाषण, लेखन व विविध माध्यमांद्वारे सरकार मराठा समाजासाठी सकारात्मक असून भरीव काम करीत असल्याचे सांगितले; परंतु दोन वर्षांत या संस्थेतर्फे समाजासाठी कोणतेही काम झालेले दिसत नाही.

केवळ या समाजासाठी एक अहवाल सादर करण्याखेरीज या संस्थेकडून काहीच काम झालेले नाही.कोल्हापुरात १ सप्टेंबरला सकल मराठा समाजाच्या आंदोलनप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व मंत्रिगटाने या संस्थेसाठी ५ कोटींची तरतूद केल्याचे पत्राद्वारे कळविले आहे; परंतु मंगळवारी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनीपुण्यात जाऊन संस्थेच्या कार्यालयाला भेट दिली असता येथे कोणतेही कामकाज सुरू नसल्याचे दिसून आले. त्यामुळे डॉ. मोरे यांनी याची जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. शिष्टमंडळात प्रताप नाईक, उत्तम जाधव, उदय गायकवाड, आदींचा समावेश होता.काय आहे ‘सारथी’ संस्थाडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) धर्तीवर राज्य शासनाने गतवर्षी मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) संस्थेची घोषणा केली.कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम, प्रत्यक्ष मुलाखतीचे प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या माध्यमातून बहुजन समाजातील म्हणजे मुख्यत: मराठा समाजातील तरुण-तरुणींना पाठबळ देणार म्हणून सरकार सांगत होते; परंतु इतर घोषणांप्रमाणेच या संस्थेनेही काही केले नसल्याची तक्रार आहे. 

माझ्या राजीनाम्याची मागणी झाली, हे मला ‘लोकमत’ कडूनच समजले. सकल मराठा समाजाचे नेमके काय म्हणणे आहे, हे त्यांनी दिलेले निवेदन पाहून समजून घेतो व त्यानंतरच मी यासंबंधी बोलू शकेन.- डॉ. सदानंद मोरे, अध्यक्ष, सारथी संस्था, पुणे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmarathaमराठा