सरस्वती, जयहिंद अ, डायनॅमिकची घोडदौड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:03 IST2021-01-13T05:03:24+5:302021-01-13T05:03:24+5:30
(फोटो) लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील डायनॅमिक स्पोर्टस्वर १९ वर्षाखालील मुलांच्या खो-खो स्पर्धेत अनेक रंगतदार सामने झाले. ...

सरस्वती, जयहिंद अ, डायनॅमिकची घोडदौड
(फोटो)
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील डायनॅमिक स्पोर्टस्वर १९ वर्षाखालील मुलांच्या खो-खो स्पर्धेत अनेक रंगतदार सामने झाले. यामध्ये सरस्वती, जयहिंद अ, डायनॅमिक अ आणि शिरोळ तालुका या चार संघांनी आपली विजयी घोडदौड कायम ठेवली व उपांत्य फेरीत प्रवेश केला.
रविवारी रात्री उशिरापर्यंत उपांत्य व अंतिम सामने खेळण्यात आले. बाद फेरी पद्धतीने खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत जयहिंद ब, छत्रपती अ, डायनॅमिक अ, सरस्वती, इलेव्हन अ, जयहिंद अ या संघांनी सुरुवातीपासूनच वर्चस्व निर्माण केले होते. त्यामधून सरस्वती, जयहिंद अ, डायनॅमिक अ व शिरोळ तालुका या चार संघांनी दमदार कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली.
रविवारी स्पर्धेदरम्यान उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, स्वप्निल आवाडे, प्रकाश दत्तवाडे, शंकर पोवार आदींनी भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले. यावेळी वासीम बागवान, ओंकार खानाज, प्रमोद चावरे, सागर गळतगे आदी उपस्थित होते.
(फोटो ओळी) १००१२०२१-आयसीएच-०१
१००१२०२१-आयसीएच-०२
१९ वर्षाखालील मुलांच्या खो-खो स्पर्धेतील एक क्षण.