चारचाकीने ठोकरल्याने सरस्वती हायस्कूलचे प्राचार्य ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:31 IST2021-08-18T04:31:18+5:302021-08-18T04:31:18+5:30
विठ्ठल गोपाळ तुपारे (वय ५६, रा. मजरे कारवे) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते कालकुंद्री येथील सरस्वती हायस्कूलमध्ये प्राचार्य ...

चारचाकीने ठोकरल्याने सरस्वती हायस्कूलचे प्राचार्य ठार
विठ्ठल गोपाळ तुपारे (वय ५६, रा. मजरे कारवे) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते कालकुंद्री येथील सरस्वती हायस्कूलमध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत होते. ते मंगळवारी सायंकाळी रोजच्या प्रमाणे आपल्या मित्रांसोबत माणगाव रस्त्यावर फिरायला गेले होते. नेमणतग नावाच्या शेताजवळ आले असता मागून माणगावकडून पाटणे फाटाकडे येणाऱ्या एम एच ०९ सी यू ७८८१ या क्रमांकाच्या बोलेरो पिक्पने विठ्ठल यांना मागून जोरात ठोकरल्यामुळे ते रस्त्यावर आपटले. त्यांना लागलीच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण काही उपयोग झाला नाही. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने मेंदूत रक्तस्राव झाला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरा या अपघाताची नोंद चंदगड पोलीस ठाण्यात झाली. त्यांचा पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून, दोन भाऊ व बहीण असा परिवार आहे. ते खेडूत शिक्षण मंडळाच्या भावेश्वरी विद्यालय नांदवडे, हनुमान विद्यालय मांर्डेदुग येथे सहाय्यक शिक्षक म्हणून सेवा बजावली. त्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल चंदगडमध्ये त्यांनी प्राचार्य पदावर सात वर्षे सेवा बजावली. गेल्याच वर्षी त्यांची कालकुंद्री येथील सरस्वती विद्यालयात बदली झाली होती. तेथे ते प्राचार्य पदावर कार्यरत होते. ते विद्यार्थीप्रिय गणितचे शिक्षक म्हणून चंदगड तालुक्यात परिचित होते. महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेचे तालुकाप्रमुख, तसेच चारच वर्षांपूर्वी त्यांना बी.जी. काटे आदर्श पुरस्कारही मिळाला होता. रात्री उशिरा शवविच्छेदन झाले. बुधवार दि. १९ रोजी सकाळी मजरे कारवे येथे सकाळी ९ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मृत विठ्ठल तुपारे