सराफ पोवाळकरच्या पोलीस कोठडीत पुन्हा वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:18 IST2021-06-20T04:18:10+5:302021-06-20T04:18:10+5:30
कोल्हापूर : सुवर्णठेव योजनेतून ग्राहकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेला बालिंगा (ता. करवीर) येथील अंबिका ज्वेलर्सचा मालक ...

सराफ पोवाळकरच्या पोलीस कोठडीत पुन्हा वाढ
कोल्हापूर : सुवर्णठेव योजनेतून ग्राहकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेला बालिंगा (ता. करवीर) येथील अंबिका ज्वेलर्सचा मालक सतीश ऊर्फ संदीप सखाराम पोवाळकर (वय ३४, रा. कणेरकरनगर, रिंगरोड, मूळ दोनवडे, ता. करवीर) याच्या पोलीस कोठडीत दि. २४ जूनपर्यंत वाढ करण्यात आली.
बालिंगा येथे अंबिका ज्वेलर्स नावाचे पोवाळकर याचे सराफाचे दुकान होते. त्याने सुवर्ण भिशी ठेव योजना सुरू केली. त्याने भिशीत अनेकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याने कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून पलायन केले. याबाबत दि. १७ एप्रिलला करवीर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. तब्बल दोन महिन्यांनी दि. १४ जून रोजी करवीर पोलिसांनी अटक केली. त्याला दि. १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने शनिवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता, त्याच्या पोलीस कोठडीत दि. २४ जूनपर्यंत वाढ केली.