शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

संतोष ट्रॉफी: महाराष्ट्राकडून अंदमान-निकोबारचा सलामीलाच धुव्वा, तब्बल ८ गोलनी पराभव 

By सचिन भोसले | Updated: October 13, 2023 12:23 IST

कोल्हापूर : निखिल कदमच्या दोन, संकेत साळुंखे ची एक आणि  यजमान महाराष्ट्र संघाने अंदमान - निकोबार संघाचा ८- ० ...

कोल्हापूर : निखिल कदमच्या दोन, संकेत साळुंखे ची एक आणि  यजमान महाराष्ट्र संघाने अंदमान - निकोबार संघाचा ८- ० असा धुव्वा उडवीत ७७ व्या संतोष ट्रॉफी राष्ट्रीय स्पर्धेतील एफ गटात विजयी सलामी दिली. कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर आज, शुक्रवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेतील गटात सलामीची लढत यजमान महाराष्ट्र व अंदमान निकोबार याच्यात झाली. सामन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्र संघाने  सुरुवातीपासूनच वर्चस्व ठेवले. अचूक नियोजन, खोलवर चढाया करीत संपूर्ण नव्वद मिनिटांच्या खेळात चेंडू सातत्याने अंदमान निकोबार संघाच्या गोल क्षेत्रातच राहिला.महाराष्ट्राच कर्णधार निखिल कदमने १९ व २० व्या मिनिटाला सलग दोन गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. २७ व्या मिनिटाला हिमांशू पाटीलने तर जॉन्सन मॅथ्यू ने ३० व्या मिनिटाला गोल केला. ४५ व्या मिनिटाला हिमांशू पाटीलने वैयक्तिक दुसरा गोल केला. ५९ व्या मिनिटाला अद्वैत शिंदेने तर  ६७ व्या मिनिटाला ध्रुवंश निजपने व  ७९ व्या मिनिटाला संकेत साळोखेने गोल करत महाराष्ट्र संघाची आघाडी आठ गोलपर्यंत नेली. हा सामना महाराष्ट्र संघाने जिंकत एक गटात विजेतेपदाची दावेदार असल्याची पहिल्याच सामन्यात दाखवून दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉलMaharashtraमहाराष्ट्र