शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : आयडीबीआय गैरव्यवहार प्रकरणी आरळेतील संतोष पाटील याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 17:29 IST

शासनाची पीक व पाईपलाईन कर्ज योजना मंजूर करण्यासाठी लाभार्थ्यांचे खोटे सातबारा व ‘आठ अ’ उतारा सादर करून वरणगे (ता. करवीर) येथील आयडीबीआय बँकेच्या शाखेला सुमारे आठ कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी फरार म्होरक्या संतोष बळवंत पाटील (वय ३०, रा. आरळे) याला शुक्रवारी (दि. २६) अटक केली.

ठळक मुद्देआयडीबीआय गैरव्यवहार प्रकरणी आरळेतील संतोष पाटील याला अटकचार दिवसांची पोलीस कोठडी

कोल्हापूर : शासनाची पीक व पाईपलाईन कर्ज योजना मंजूर करण्यासाठी लाभार्थ्यांचे खोटे सातबारा व ‘आठ अ’ उतारा सादर करून वरणगे (ता. करवीर) येथील आयडीबीआय बँकेच्या शाखेला सुमारे आठ कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी फरार म्होरक्या संतोष बळवंत पाटील (वय ३०, रा. आरळे) याला शुक्रवारी (दि. २६) अटक केली.

न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पाटील याने शेतकऱ्यांची कर्जप्रकरणे करून प्रत्येकी तीस हजार रुपये कमिशन घेत सुमारे दोन कोटी रुपये मिळविले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.बँकेच्या वरणगे (ता. करवीर) शाखेचे तत्कालीन व्यवस्थापक जयंत गंधे यांना हाताशी धरून पाटील याने कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला आहे. शेतकऱ्यांकडून तो पॅनकार्ड आणि आधारकार्ड घेत होता. उर्वरित सर्व कागदपत्रे, कारखान्याला घातलेला उसाची बिले स्वत: तयार करून कागदपत्रावर शेतकऱ्यांची सही घेऊन तो बॅॅँकेत अर्ज दाखल करीत होता.

दोन ते अडीच लाखांचे कर्ज मंजूर झाले की, प्रत्येक शेतकऱ्यांकडून ३० हजार रुपये कमिशन घेतले आहे. अशा सुमारे ६०० शेतकऱ्यांकडून त्याने दोन कोटी रुपये कमिशन घेतले आहे. तत्कालीन व्यवस्थापक गंधे यांनीही कमिशन घेतल्याची चर्चा आहे. त्यांनी पाटील याला बुलेट घेऊन दिली होती. ती पोलिसांनी तपासाकामी जप्त केली आहे.

पाटील याने शेतकऱ्यांना विमा पॉलिसीची सक्ती करून त्याने प्रत्येकी ३१ हजार रुपये भरून घेतले आहेत. शेतकऱ्यांच्या हाती दीड लाख रुपयेच पडले. उर्वरित रक्कम कमिशनमध्ये गेली आहे. आता मात्र बँकेत भरताना व्याजासह अडीच लाख रुपये भरण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अरविंद कांबळे अधिक तपास करीत आहेत.टेम्पोचालक बनला करोडपतीपाटील हा दोन वर्षांपूर्वी टेम्पोचालक म्हणून काम करीत होता. बँक कर्जप्रकरणामध्ये त्याला भरमसाट पैसे मिळू लागल्याने त्याचे राहणीमान सुधारले. त्याने गावात दूधसंस्था काढली. बंगला बांधला. स्वत:च्या नावे युवा मंच काढून तरुणांची फळी निर्माण केली.

दूधसंस्था काढतानाही त्याने बोगस कागदपत्रे जोडल्याची गावात चर्चा आहे. त्याला करोडपती बनविण्यामध्ये तत्कालीन बँक व्यवस्थापक गंधे यांचा हातभार असल्याचेही प्राथमिक तपासात पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे गंधेदेखील आरोपीच्या पिंजऱ्यात अडकला आहे. वरणगे येथील शाखेनंतर त्याची क्रशर चौक येथील आयडीबीआय बँकेत बदली झाली होती. त्या ठिकाणीही त्याने संतोष पाटील याला हाताशी धरून ५० लाखांच्या वरती बोगस कर्जप्रकरणे केल्याचे चौकशीत पुढे आले आहे.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर