संतोष पोळच्या इस्टेटीचे पुढचे ‘टार्गेट’ होते सातारा !

By Admin | Updated: August 20, 2016 00:20 IST2016-08-19T23:17:18+5:302016-08-20T00:20:02+5:30

अडीच एकर शेतीसाठी धडपड : पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी संबंधित एजंट कुटुंबासह गायब

Santosh Patel's next project 'Satyarthi'! | संतोष पोळच्या इस्टेटीचे पुढचे ‘टार्गेट’ होते सातारा !

संतोष पोळच्या इस्टेटीचे पुढचे ‘टार्गेट’ होते सातारा !

दत्ता यादव -- सातारा --वाईतून सातत्याने होत असलेल्या तक्रारी तसेच एक ना एक दिवस आपल्या पापाचा घडा भरेल, या भीतीने संतोष पोळने पुढचे ‘टार्गेट’ सातारा ठेवले होेते. साताऱ्यामध्ये फार्म हाऊस टाकण्याचा त्याने निर्णय घेतला होता. साताऱ्यातील एका एजंटाशी त्याने अडीच एकर जमीन घेण्यासाठी संपर्क केला होता. त्याच्या घरी येणे-जाणे असायचे; मात्र जमिनीचा व्यवहार पूर्ण होण्याआदीच संतोष पोळचे बिंग बाहेर पडले. मोबाईलवर वारंवार संपर्क असल्यामुळे पोलिसांनी कॉल डिटेल्स तपासल्यावर आपल्यामागे ससेमिरा लागेल, या भीतीपोटी साताऱ्यातील एका एजंटाने आपल्या कुटुंबासह चक्क घर सोडलंय.वाई परिसरामध्ये संतोष पोळची चांगलीच दहशत होती. अनेकांना त्याने दुखावले होते. त्यामुळे तो केव्हा आपल्या तावडीत सापडतोय, याची अनेकजण वाटच पाहत होते. याची जाणीवही संतोष पोळला झाली होती. तसेच वाई पोलिस ठाण्यात सातत्याने तक्रारी अर्ज येत असल्यानेही पोळ वैतागल्याने साताऱ्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता.
गेल्या सहा महिन्यांपासून त्याचा साताऱ्यात वावर वाढला होता. जमीन एजंटांना भेटून सातारा शहराला लागून कुठे अडीच ते तीन एकर जमीन आहे का, याची तो माहिती घेत होता. यावेळी त्याची साताऱ्यातील एका जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या एजंटाशी ओळख झाली. आपण डॉक्टर असल्याचे संतोष पोळने एजंटाला ओळख करून दिली होती. कोट्यवधीचा व्यवहार असल्यामुळे त्या एजंटाने शहर परिसरात जागा बघण्यास सुरुवात केली. एका ठिकाणी त्याला जागा पसंत पडली; मात्र जागेचा दर जास्त सांगितल्यामुळे व्यवहार फिसकटला; परंतु त्याच ठिकाणी दुसरी जागा पोळला पसंत पडली. पैशांची जुळवाजुळव करून ‘येत्या काही दिवसांत आपण जागेचा व्यवहार करू,’ असे पोळने त्या एजंटाला सांगितले होते. या व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात कमिशन मिळणार असल्याने तो एजंट रोज पोळच्या संपर्कात होता. नेहमी पंधरा-वीस मिनिटे तो पोळशी मोबाईलवर बोलत होता. परंतु त्या जागेचा व्यवहार होण्यापूर्वीच पोळची कृत्ये समोर आली. पोळचे एजंटाच्या घरी येणे-जाणे असल्यामुळे त्या एजंटाला पोळची कृत्ये ऐकून धक्का बसला. गेल्या तीन दिवसांपासून तो एजंट अस्वस्थ होता. त्यामुळेच त्याने विनाकारण पोलिसांचा पाठीमागे ससेमिरा नको म्हणून काही दिवसांसाठी घर सोडण्याचा निर्णय घेतला.


मला पोलिस चौकशीला बोलवतील का?
आपण पोळच्या संपर्कात होतो, हे पोलिसांनी कॉलडिटेल्स काढल्यानंतर समजणार, त्यामुळे तो एजंट अस्वस्थ होता. शहर पोलिस ठाण्यातील एक पोलिस कर्मचारी त्याच्या ओळखीचा होता. पोळ माझ्या ओळखीचा आहे. आणि माझे त्याच्यासोबत फोनवर रोज बोलणे व्हायचे. त्यामुळे मला पोलिस चौकशीला बोलवतील का, अशी विचारणा त्या एजंटाने त्याच्या ओळखीच्या पोलिसाकडे केली होती. त्यावेळी त्या पोलिसाने काही होणार नाही. तुला चौकशीला बोलविल्यानंतर ‘तू जा आणि सर्व खरं सांग,’ असे त्याला सांगितले. मात्र, त्या पोलिस मित्रावर त्याचा विश्वास बसला नाही. घरी गेल्यानंतर त्याने हे पत्नीला सर्व सांगितले. त्यानंतर बुधवारी रात्री हे कुटुंब घराला कुलूप लावून गायब झाले.

Web Title: Santosh Patel's next project 'Satyarthi'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.