शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: बाळूमामांची बकरी घुसतात उभ्या पिकात, शेतकऱ्यांना सोसावा लागतोय तोंड दाबून बुक्क्यांचा मार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 13:04 IST

कथित कहाण्या आणि गोष्टींमुळे शेतकऱ्यांना हताशपणे पाहण्याशिवाय काहीच करता येईना

राशिवडे : संत बाळूमामा ट्रस्टच्या मेंढरांचे कळप उभ्या पिकांत घुसत आहेत. ‘मेंढरांचा कळप बाळूमामांचा हाय. आडवू नका न्हाईतर धोक्यात येशीला’ अशा भीतीने ऊस, मका, शाळू, वैरणीसाठीच्या या पिकांचा फडशा पडत आहे. अंधश्रद्धेपोटी शेतकरी उभी पिके खाणाऱ्या मेंढरांच्या कळपांना साधे हटकण्याचेही धाडस करताना दिसत नाही. त्यामुळे नुकतीच उगवण होत असलेली भुईमूग, मका पिके व पूर्व मशागती पूर्ण झालेले ऊस या कळपांच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. कथित कहाण्या आणि गोष्टींमुळे शेतकऱ्यांना हताशपणे पाहण्याशिवाय काहीच करता येईनासे झाले असून या विरोधात दाद मागायची कोणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत संत बाळूमामा ट्रस्टचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कारभाऱ्यांशी बोलतो आणि तळ उठवायला सांगतो, असे सांगत फोन बंद केला.संत बाळूमामांबद्दल समाजात मोठी आस्था आहे. या आस्थेच्या आड ट्रस्टच्या मेंढरांचे कळप उभ्या पिकात घुसत आहेत. कळपांचे कारभारी व सेवेकरी दीड हजारावर मेंढरे घेऊन परिसरातून फिरत आहेत. तीन दिवसांपासून येथे तळ ठोकलेल्या कळपांनी शेतकऱ्यांची उभी पिके फस्त केली. जे शेतकरी या कळपांना आपल्या शेतात येण्यापासून रोखतात त्यांना ‘भविष्यात वाईट घटना ऐकायला मिळणार, मामांची बकरी हाईत, आडवू नका, वाईट घडंल’, असा गैरसमज पसरवला जात आहे. त्यामुळे शेतकरी कात्रीत सापडला आहे. मामांची मेंढरं शेतातून फिरल्यास दुप्पट उत्पन्न येते, असाही समज करून दिला जात आहे. दहा-पंधरा दिवसाची पीक फस्त झाल्यानंतर शेतात काहीच शिल्लक राहत नाही, मग दुप्पट मिळणार कुठून, हे सत्य असताना अंधश्रद्धेच्या भीतीपोटी शेतकरी सहन करत आहेत. विरोध केल्यास त्यांची सोशल मीडियावरून बदनामी केली जात आहे.याबाबत ग्रामपंचायतीत मंगळवारी झालेल्या बैठकीत हे कळप ताबडतोब गावातून हलवायला सांगण्याबरोबर पूर्वपरगावानगीशिवाय पुन्हा गावात कळप आणायचे नाहीत असे एकमताने ठरले. उपसरपंच अजिंक्य गोनुगडे, ग्रामपंचायत सदस्य धैर्यशील पाटील, आप्पा डकरे, सर्जेराव गोंगाणे, अशोकराव पाटील, धोंडीराम ऊर्फ पोपट पाटील, श्रीशेल मगदूम, रमाकांत तोडकर, दिलीप शिंदे, भरत पाटील, राजेंद्र जाधव, शंकर पाटील आदींसह शेतकरी उपस्थित होते.

बाळूमामांच्या कळपाविषयी शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. याविषयी ट्रस्टच्या विश्वस्तांशी संपर्क साधला मात्र कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे स्वतः शेतकऱ्यांनी पुढे येऊन तक्रारी नोंदवाव्यात. अंधश्रद्धेतून पिकांचे नुकसान होऊ देऊ नये. - उत्तम पाटील, पोलिस पाटील, राशिवडे बुद्रूक (ता. राधानगरी) 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBalumamachya Navane Changbhaleबाळूमामाच्या नावानं चांगभलंFarmerशेतकरी