संजीवनी अभियानात ४७८ नागरिकांची तपासणी, २२ बाधित आढळले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:18 IST2021-06-01T04:18:30+5:302021-06-01T04:18:30+5:30

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनामार्फत संजीवनी अभियानाअंतर्गत सोमवारी ६८९७ नागरिकांची तपासणी करण्यात आली. या अभियानात व्याधीग्रस्त ४७८ नागरिकांपैकी २२ ...

In Sanjeevani Abhiyan, 478 citizens were examined and 22 were found affected. | संजीवनी अभियानात ४७८ नागरिकांची तपासणी, २२ बाधित आढळले.

संजीवनी अभियानात ४७८ नागरिकांची तपासणी, २२ बाधित आढळले.

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनामार्फत संजीवनी अभियानाअंतर्गत सोमवारी ६८९७ नागरिकांची तपासणी करण्यात आली. या अभियानात व्याधीग्रस्त ४७८ नागरिकांपैकी २२ पॉझिटिव्ह आढळून आले.

सर्वेक्षणादरम्यान ६७२२ व्याधीग्रस्त नागरिकांची वॉकटेस्ट घेण्यात आली. यामध्ये कोविड सदृश्य लक्षणे असणारे ५६ नागरिक आढळून आले. तर ८६० व्याधीग्रस्त नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली.

महापालिकेच्या ११ प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत शहरातील संवेदनशील भागात १५० वैद्यकीय पथकाद्वारे ही मोहीम संभाजीनगर, मंगळवार पेठ, काळकाई मंदिर, शिवाजी पेठ, राजारापुरी, शाहूनगर, प्रतिभानगर, सम्राटनगर, मातंग वसाहत, पंचगंगा तालीम, कसबा बावडा, लाईन बझार, शिवाजी पार्क, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, साईक्स एक्स्टेशन, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, टाकाळा, रामानंदनगर, अंबाई टँक, नाना पाटीलनगर, लक्षतीर्थ वसाहत, कारंडे मळा, विचारेमाळ, रमनमळा, शनिवार पेठ, वाल्मीकीनगर, संभाजीनगर येथे राबविण्यात आली.

Web Title: In Sanjeevani Abhiyan, 478 citizens were examined and 22 were found affected.