संजीवन इंजिनिअरिंग, पारळे अकॅडमी विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:14 IST2021-02-19T04:14:52+5:302021-02-19T04:14:52+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या क गट टी-२० क्रिकेट स्पर्धेत संजीवन इंजिनिअरिंग काॅलेजने पॅकर्स क्रिकेट ...

Sanjeevan Engineering, Parle Academy won | संजीवन इंजिनिअरिंग, पारळे अकॅडमी विजयी

संजीवन इंजिनिअरिंग, पारळे अकॅडमी विजयी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या क गट टी-२० क्रिकेट स्पर्धेत संजीवन इंजिनिअरिंग काॅलेजने पॅकर्स क्रिकेट क्लब (क) चा, तर विठ्ठल पारळे क्रिकेट अकॅडमीने रमेश कदम क्रिकेट अकॅडमीचा पराभव करीत स्पर्धेची पुढील फेरी गाठली.

राजाराम काॅलेज मैदानावर गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना संजीवन संघाने २० षटकांत ९ बाद १५१ धावा केल्या. यात विपूल पाटीलने ४१, सूरज पोवारने २४, सौरभ भोसलेने १७, ओंकार रायनाईकने १५ व निखिल सावंतने १० धावा केल्या. पॅकर्सकडून शुभम घोटगाळकर, झहिर अन्सारी यांनी प्रत्येकी दाेन, तर अभिनव बिराजदार, कृष्णा वर्मा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना पॅकर्सला हे आव्हान पेलवले नाही. त्यांचा सर्व संघ १५.५ षटकांत ७८ धावांत गुंडाळला. कृष्णा अग्रवालने नाबाद १३ धावा केल्या. गोलंदाजी करताना संजीवनकडून सूरज पोवार, निखिल सावंत यांनी प्रत्येकी तीन, सौरभ भाेसलेने दोन व ओंकार रायनाईकने एक बळी घेत विजयावर शिक्कामोर्तब केला.

दुपारच्या सत्रात झालेल्या दुसऱ्या सामन्यात विठ्ठल पारळे संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद ९८ धावा केल्या. यात पृथ्वी पुरोहितने नाबाद ४६, सोहेल नदाफ, अरंजय पाटील, सिद्धेश जाधव यांनी प्रत्येकी दहा धावा केल्या. कदम अकॅडमीकडून गोलंदाजी करताना विश्वजित कावळेने तीन, समर्थ पोवारने दोन व अनूप रावने एक बळी घेतला. यात नीलेश चव्हाणने ३२, तमिळ अरर्षणने १७ व जयंत घुणकीकर याने १३ धावा केल्या. पारळेकडून आदित्य भोसलेने दोन, सिद्धेश पोवार, सोहेल नदाफ व सिद्धेश जाधव यांनी प्रत्येकी एक बळी घेत विजयावर शिक्कामोर्तब केला.

Web Title: Sanjeevan Engineering, Parle Academy won