रेल्वेस्थानकासह विविध कामांची संजीव मित्तल यांच्याकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:25 IST2021-01-23T04:25:33+5:302021-01-23T04:25:33+5:30
कोल्हापूर : मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय रेल्वेस्थानकांच्या वार्षिक तपासणीअंतर्गत शुक्रवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी शुक्रवारी शाहू ...

रेल्वेस्थानकासह विविध कामांची संजीव मित्तल यांच्याकडून पाहणी
कोल्हापूर : मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय रेल्वेस्थानकांच्या वार्षिक तपासणीअंतर्गत शुक्रवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी शुक्रवारी शाहू छत्रपती टर्मिनन्स कोल्हापूर रेल्वेस्थानकास भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी जयसिगंपूरजवळील विद्युतीकरणासह कृष्णा नदीजवळील रेल्वे पुलाच्या मजबुतीकरणाचे कामाची पाहणी केली.
मध्य रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या मुंबई, भुसावळ, पुणे, सोलापूर, नागपूर या विभागांची वार्षिक तपासणी सुरू आहे. त्याअंतर्गत पुणे विभागातील कोल्हापूर-सातारा रेल्वेमार्गाची शुक्रवारी तपासणी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी केली. यामध्ये त्यांनी कोल्हापूर रेल्वेस्थानकाची पाहणी केली. या पाहणीवेळी खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रकांत जाधव यांच्याशी मित्तल यांनी विविध प्रश्नी चर्चा केली. या चर्चेदरम्यान कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग, बंद केलेल्या सह्याद्री, सोलापूर, पुणे पॅसेंजर आदी रेल्वे पूर्ववत कराव्यात. यासंबंधी चर्चा झाली. त्यानंतर अखिल भारतीय ग्राहक पंचायत, कोल्हापूर महानगर प्रवासी विभागाच्या रेल्वे प्रवासी संघटनांच्या वतीने रेल्वे स्टेशनवरील विविध समस्यांबाबत निवेदन दिले. त्यानंतर जयसिंगपूर येेथे नव्याने करण्यात आलेल्या विद्युतीकरणाचीही पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी कृष्णा नदीवरील जुन्या रेल्वे पुलाचे मजबुतीकरणाचे कामाची पाहणी केली. या ठिकाणी त्यांनी संबंधित कामाची तांत्रिक माहिती रेल्वेच्या अभियंताकडून घेतली. कामाबाबतच्या सूचनाही कर्मचाऱ्यांना केल्या. त्यानंतर मिरज , सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, कोरेगाव, रहीमतपूर, कोरेगाव, सातारा अशा स्थानकांसह रेल्वेमार्गाची तांत्रिक पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत मध्यरेल्वेच्या मुंबई क्षेत्राचे मुख्य कार्यकारी व्यवस्थापक डी. के. सिंग, पुणे विभागाच्या मंडल प्रबंधक रेणू शर्मा, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणीयांच्यासह मध्य रेल्वेचा अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
चौकट
कोल्हापूरकरांच्या समस्या आहे तशाच
कोल्हापूर रेल्वेस्थानकातून कोयना व महाराष्ट्र एक्स्प्रेस धावते. अन्य रेल्वे कोरोनाच्या काळात बंद केल्या आहेत. त्या पूर्ववत सुरू कराव्यात, गांधीनगरचा थांबा, कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग, रेल्वेस्थानकातील समस्यांबाबतची निवेदन त्यांनी विविध संघटनांकडून स्वीकारले. मात्र, कोणतेही आश्वासन त्यांनी केले नाही. त्यामुळे प्रवासी संघटनांनी नाराजी व्यक्त केली.
फोटो : २२०१२०२१-कोल-रेल्वे०१, ०२
आेळी : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी छत्रपती शाहू टर्मिनन्स कोल्हापूर रेल्वेस्थानकास वार्षिक तपासणीअंतर्गत शुक्रवारी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या मंडल प्रबंधक रेणू शर्मा आदी उपस्थित होते.
(छाया : नसीर अत्तार)