संजय साळुंखे, निशिकांत भुजबळ रूजू

By Admin | Updated: May 18, 2017 17:42 IST2017-05-18T17:42:54+5:302017-05-18T17:42:54+5:30

राजारामपुरी, जुना राजवाडा नूतन पोलीस निरीक्षक

Sanjay Salunkhe, Nishikant Bhujbal Ruju | संजय साळुंखे, निशिकांत भुजबळ रूजू

संजय साळुंखे, निशिकांत भुजबळ रूजू

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. १८ : येथील राजारामपुरी पोलीस ठाण्याचे नूतन निरीक्षक संजय साळुंखे तर जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक निशिकांत भुजबळ यांनी बुधवारी (दि. १७) रात्री पदभार स्वीकारला. साळुंखे हे यापूर्वी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे तर भुजबळ हे जिल्हा विशेष शाखेत कार्यरत होते.

राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख यांची सांगली जिल्ह्यातील तुरची प्रशिक्षण केंद्र येथे तर जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (मुंबई) येथे बदली झाली आहे. राजारामपुरीचा तात्पुरता पदभार पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांच्याकडे होता. चौधरी यांच्याकडून साळुंखे यांनी तर अनिल देशमुख यांच्याकडून भुजबळ यांनी पदभार स्वीकारला.

साळुंखे यांनी यापूर्वी शिवाजीनगर (इचलकरंजी), सांगली, तासगांव आदी ठिकाणी तर भुजबळ यांनी मुंबई, पुणे तसेच कागल पोलीस ठाणे येथे काम केले आहे. वर्षभरापूर्वी त्यांची जिल्हा विशेष शाखेत बदली झाली होती.

 

Web Title: Sanjay Salunkhe, Nishikant Bhujbal Ruju