शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे नव्हे तर शरद पवारांचे; भाजपाच्या चंद्रकांत पाटलांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 14:27 IST

संजय राऊत हे युक्रेनवरून आल्यासारखे झालेले स्वागत अनाकलनीय आहे असे ते म्हणाले.

कोल्हापूर : आतापर्यंत महाविकास आघाडीच्या इतक्या नेत्यांवर कारवाई झाली. परंतू ज्येष्ठ नेते शरद पवार कोणालाही भेटायला गेले नाहीत. मात्र संजय राऊत यांच्यावर कारवाई झाल्यावर मात्र त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आठवले. मी खूप आधीपासून सांगत होतो की संजय राऊत हे शिवसनेचे कमी आणि पवारांचे जास्त आहेत यावर हे शिक्कामोर्तबच आहे असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये आणि महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे उपस्थित होते.पाटील म्हणाले, शरद पवार हे फक्त चहा प्यायला नरेंद्र मोदींकडे जाणार नाहीत, एवढे मी खात्रीने सांगतो. पृथ्वीराज चव्हाण हे अधूनमधून पेपर वाचत असावेत. त्यामुळे ईडीच्या छाप्यातून काही निष्पन्न होत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या सात्विक स्वभावामुळेच महाराष्ट्राचा काय विकास झाला याचे आपण साक्षीदार आहोत.सोमय्यांची चूक असेल तर शासन होईलभाजप नेते किरीट सोमय्या यांनी विक्रांत युद्धनौकेच्या नावावर लोकवर्गणीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. यासंबंधी विचारले असता, किरीट सोमय्यांची चूक असेल तर शासन होईल असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.अंधारात कोणी काही पोस्टर लावणार असेल तर..कोथरूडमध्ये मी सुरू केलेला फिरता दवाखाना, फिरते वाचनालय सुरू आहे. कोविड काळात मी खूप काम केले आहे. आता अंधारात कोणी काही पोस्टर लावणार असेल तर त्याला काय करणार असेही पाटील म्हणाले.राऊतांचे युक्रेनवरून आल्यासारखे झालेले स्वागत अनाकलनीयशिवसेना नेते संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने जप्तीची कारवाई केल्यानंतर पहिल्यांदाच राऊत दिल्लीहून मुंबईत येत आहे. त्यामुळे राऊतांच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावर शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. यावरुन चंद्रकांत पाटलांनी राऊतांना टोला लगावला. संजय राऊत हे युक्रेनवरून आल्यासारखे झालेले स्वागत अनाकलनीय आहे असे ते म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलSanjay Rautसंजय राऊतSharad Pawarशरद पवार