संजय पवारांचा महामंडळासाठी आटापिटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:49 IST2021-09-02T04:49:32+5:302021-09-02T04:49:32+5:30

कोल्हापूर राज्यातील तमाम मंदिरे भाविकांना खुली करावीत, यासाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने सोमवारी संपूर्ण राज्यात ...

Sanjay Pawar's struggle for Mahamandal | संजय पवारांचा महामंडळासाठी आटापिटा

संजय पवारांचा महामंडळासाठी आटापिटा

कोल्हापूर राज्यातील तमाम मंदिरे भाविकांना खुली करावीत, यासाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने सोमवारी संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात आले. यावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी टीका केली. परंतु कोणत्या तरी महामंडळावर वर्णी लागावी, यासाठी आटापिटा करणाऱ्या संजय पवार यांनी आमचा हिंदुत्ववाद काढू नये, अन्यथा त्यांच्या ‘साठा उत्तराच्या’ कहाण्या ऐकवण्याची आमची तयारी आहे, असा इशारा भाजपने दिला आहे.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, सरचिटणीस अशोक देसाई, विजय जाधव यांनी पत्रकाव्दारे हा इशारा दिला आहे. मंदिरे उघडा म्हणजे हिंदुत्वाचा ढोंगीपणा असे वक्तव्य करणाऱ्यांनी जरा आपला इतिहास तपासून पाहावा. युवक काँग्रेसचे बाळकडू प्यायलेल्यांनी आमचा हिंदुत्ववाद काढ़ू नये, आम्ही कधीच खिशात "टोपी" आणि गमछा" बाळगून फिरत नाही. पवार यांनी आरोप करत असताना पूर्ण माहिती घेऊन बोलावे. अर्धवट माहितीच्याआधारे रेटून बोलायचे, हे धंदे त्यांनी आता बंद करावेत. हवेत बोलून आपले अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करून आपला आणि आपल्या पक्षाचा पाणउतारा करून घेऊ नये.

Web Title: Sanjay Pawar's struggle for Mahamandal