शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: संजय मंडलिक, राजू शेट्टी यांचा प्रचाराचा खर्च जास्त; प्रमुख उमेदवारांनी केलेला खर्च..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 12:24 IST

खर्चात तफावत आढळल्याने दोन उमेदवारांना नोटीस

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत एप्रिल अखेरपर्यंत कोल्हापूर मतदारसंघात सर्वाधिक खर्च महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी हे खर्चात आघाडीवर आहेत. दरम्यान, निवडणूक प्रशासनाने लावलेला आणि उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चात तफावत आढळल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती आणि मंडलिक यांना नोटीस काढली आहे.‘कोल्हापूर’मधून २३ तर ‘हातकणंगले’तून २७ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक आयोगाने उमेदवारांना खर्चाची मर्यादा ९५ लाख रुपये आहे. उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या दिवसांपासून ते ३० एप्रिल अखेरपर्यंतचा खर्च निवडणूक प्रशासनाकडे दाखल केला आहे. याची पडताळणी खर्च तपासणी समितीने केली आहे. निवडणूक प्रशासनाने निश्चित केलेल्या खर्चाचे दर आणि उमेदवाराने दिलेल्या खर्चाची पडताळणी समिती करीत आहे. यामध्ये तफावत आढळल्याने मंडलिक आणि शाहू छत्रपती यांना नोटीस दिली आहे.शाहू छत्रपती यांनी केलेला खर्च आणि प्रशासनाने लावलेल्या खर्चात ४ लाख ७८ हजार ५०० तर मंडलिक यांच्या खर्चात २१ लाख २० हजार ३९२ रुपये खर्चात तफावत आढळली आहे. स्वत:ची वाहने घेऊन प्रचार सभेला आणि प्रचार यात्रेला आलेल्या वाहनांचा खर्चही प्रशासनाने उमेदवारांवर टाकला आहे. हा खर्च उमेदवारांनी अमान्य केला आहे. म्हणून खर्चात तफावत आढळल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

प्रमुख उमेदवारांनी केलेला खर्च असा :कोल्हापूर : शाहू छत्रपती (काँग्रेस) : ४१ लाख ४१ हजार ४८४, संजय मंडलिक (शिंदेसेना) : ५२ लाख २९ हजार ८२५, बाजीराव खाडे ( अपक्ष) : २ लाख १५ हजार ४३८.हातकणंगले : धैर्यशील माने ( शिंदेसेना): १८ लाख ५३ हजार २६१, सत्यजित पाटील (उद्धवसेना) : २० लाख ६४ हजार ५६४, राजू शेट्टी ( स्वाभिमानी शेतकरी संघटना) : २७ लाख ४७ हजार ९५७, डी. सी. पाटील ( वंचित): ६ लाख २४ हजार २५.

सर्वांत कमीआतापर्यंत सादर केलेल्या खर्चात कोल्हापूरमध्ये सर्वांत कमी ॲड. यश हेगडे-पाटील यांनी १३ हजार तर हातकणंगलेतून अपक्ष उमेदवार लक्ष्मण तांदळे यांनी १२ हजार ८०० रुपये इतका खर्च केला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४sanjay mandlikसंजय मंडलिकRaju Shettyराजू शेट्टीhatkanangle-pcहातकणंगले